रत्नागिरी, चिपळूणला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2015 00:43 IST2015-09-11T00:41:37+5:302015-09-11T00:43:39+5:30
शेतकऱ्यांचा जीव भांड्यात

रत्नागिरी, चिपळूणला पावसाने झोडपले
रत्नागिरी : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रत्नागिरीला गुरुवारी झोडपून काढले, तर पावसाचा प्रवास चिपळूणकडे सरकला असून, गुरुवारी पावसाने येथेही हजेरी लावली.
गेले दोन दिवस सायंकाळच्या सत्रात मुसळधार पाऊस बरसत आहे. रत्नागिरीत गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हातखंबा, रत्नागिरी, कुवारबाव, शिरगाव, आदी भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे वाहनचालकांचे हाल झाले. लांजा शहर आणि परिसरातही पाऊस झाला, तर राजापूरच्या
काही भागात सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली.
चिपळूण तालुक्यातील असुर्डे, कोकरे, आदी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. संगमेश्वर तालुक्यातही गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. (प्रतिनिधी)