रत्नागिरी : जिल्ह्यात बारा उपकेंद्रांना मंजुरी
By Admin | Updated: November 7, 2014 23:41 IST2014-11-07T22:01:44+5:302014-11-07T23:41:48+5:30
जिल्हा परिषद : आरोग्यसेवेला प्राधान्य

रत्नागिरी : जिल्ह्यात बारा उपकेंद्रांना मंजुरी
रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या बारा उपकेंद्रांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाची जिल्हाभरात ३६५ उपकेंद्र आहेत. यातील अनेक उपकेंद्र भाड्याच्या जागेत आहेत, तर काही उपकेंद्रांच्या इमारती नादुरुस्त झाल्याने त्या मोडकळीस आल्या आहेत.
उपकेंद्र स्वत:च्या मालकीच्या जागेत व्हावीत, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींकडे जागांची मागणी केली होती. त्याप्रमाणे जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतींकडून उपकेंंद्रांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून, जिल्हा परिषदेकडेही प्रस्ताव आले आहेत.
ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करुन दिल्याने त्यांच्या हद्दीमध्ये आरोग्य उपकेंद्र होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना या उपकेंद्रांवर उपचार मिळणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची जिल्हाभरात ३६५ उपकेंद्र आहेत. त्यामधील अनेक उपकेंद्रांच्या जागेचा प्रश्न कायम प्रलंबित राहिला आहे. त्यातून मार्ग काढण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, या मागणीकडे आता लक्ष देण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील १२ उपकेंद्रांना मंजुरी मिळाली आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागाची जिल्हाभरातील उपकेंद्र सक्षम करण्याचा प्रयत्न सर्व स्तरावर झाल्यास त्यातून ग्रामीण भागातील रूग्णसेवा अधिक कार्यक्षम करता येणे शक्य असल्याने आता संबंधित गावातील ग्रामपंचायतींनी उपकेंद्रासाठी जागा दिल्याने या उपकेंद्रांची उभारणी लवकरच करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागाने उपकेंद्रांद्वारे ग्रामीण भागातील रूग्णांना अधिकाधिक सेवा सुविधा मिळाव्यात, यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू असून, जागांचे प्रस्ताव आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. इमारतींचा प्रश्न गेले अनेक वर्षे प्रलंबित असून, त्यातील काही उपकेंद्रांच्या नवीन उभारणीमुळे ग्रामीण भागाशी आरोग्याची नाळ जोडण्याचे काम याद्वारे होणार आहे. (शहर वार्ताहर)
उपकेंद्रांसाठी जागा मिळालेल्या ग्रामपंचायती
मंडणगडजावळे ग्रामपंचायत
गुहागरसुरळ, वडद, पेवे
चिपळूणकोळकेवाडी,
दहिवली, बामणोली.
लांजाइंदवटी, वेरळ,
आरगाव.
संगमेश्वरपरचुरी.
रत्नागिरीशिरगाव.
आरोग्य सुविधेला प्राधान्य
रुग्णांना आरोग्य सेवा मिळणार.
भाड्याच्या जागेचा प्रश्न कायम.
जिल्हाभरात ३६५ उपकेंद्र.
काही उपकेंद्रांच्या इमारती नादुरूस्त झाल्याने मोडकळीस.
नव्या उपकेंद्रामुळे ग्रामीण रूग्णसेवेला गती मिळणार.
सक्षम आरोग्य यंत्रणेसाठी उपकेंद्राचा आधार.
जिल्हा परिषदेकडे नव्या उपकेंद्रांचे प्रस्ताव.
आरोग्य सुविधांवर भर हवा.
जिल्ह्यात बारा उपकेंद्रांना मंजुरी