शिधापत्रिकाधारकांनी आधार क्रमांक जमा करण्याची ३१ आॅगस्टची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 13:16 IST2017-08-31T13:16:02+5:302017-08-31T13:16:06+5:30
सिंधुदुर्गनगरी दि. ३१ : केंद्र शासनाच्या अन्न मंत्रालयाच्या दिनांक ८ फेब्रुवारी २0१७ च्या अधिसुचनेनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांने , शिधापत्रिकाधारकांनी आधार क्रमांक संबंधित कार्यालयास ३१ आॅगस्ट २0१७ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

शिधापत्रिकाधारकांनी आधार क्रमांक जमा करण्याची ३१ आॅगस्टची मुदत
सिंधुदुर्गनगरी दि. ३१ : केंद्र शासनाच्या अन्न मंत्रालयाच्या दिनांक ८ फेब्रुवारी २0१७ च्या अधिसुचनेनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांने , शिधापत्रिकाधारकांनी आधार क्रमांक संबंधित कार्यालयास ३१ आॅगस्ट २0१७ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
आपल्या सोयीच्या दृष्टीने आपण दिनांक ३१ आॅगस्ट २0१७ पर्यंत आपले आधार क्रमांक आपल्या गावातील धान्य दुकानदार यांच्याकडे कृपया जमा करावेत. दि. ३१ आॅगस्ट २0१७ पर्यंत आधार क्रमांक जमा न करणारा लाभार्थी दि. १ सप्टेंबर २0१७ नंतर धान्याचा लाभ मिळण्यापासून वंचित रहाण्याची शक्यता असल्याचे सावंतवाडीच्या तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकाºयांनी कळविले आहे.