सावंतवाडीने जिंकली रसिकमने

By Admin | Updated: November 3, 2014 23:27 IST2014-11-03T22:31:41+5:302014-11-03T23:27:54+5:30

विभागीय नृत्य स्पर्धा : विविध नृत्यांनी प्रेक्षक भारावले

Rasikamane won by Sawantwadi | सावंतवाडीने जिंकली रसिकमने

सावंतवाडीने जिंकली रसिकमने

शिरगांव : आपली संस्कृती विविध नृत्याविष्काराने सादर करत कामगार कल्याण मंडळाच्या लोकनृत्य स्पर्धेत पोफळीत कोकण विभागातील ९ संघांनी रसिकांची मने जिंकली. सावंतवाडी संघाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
ही नृत्य स्पर्धा अलिकडेच पार पडली. स्पर्धेला स्पर्धकांसह रसिकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला. कामगार कल्याण मंडळाच्या आयोजित केलेल्या या स्पर्धेचा निकालही लगेचच जाहीर करण्यात आला. विभागीय लोकनृत्य स्पर्धेत सावंतवाडी संघाच्या डांग नृत्याने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला. मालवण संघ कर्मा नृत्य द्वितीय क्रमांक तर यजमान पोफळी संघाने टिपरी नृत्य सादर करत तृतीय क्रमांक
मिळवला. करमणूक केंद्र, पोफळी येथे झालेल्या नृत्य स्पर्धेत निकषावर आधारित जाखडी, फुगडी, राजस्थानी नृत्य सादर करण्यात आली. महाजनकोचे अधीक्षक अभियंता अशोक गणेशपुरे, कार्यकारी अभियंता ए. डी. शिंदे, कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर, गुणवंत कामगार दीपक टाकळे, उदय पोटे, संतोष शिंदे, मंगेश डोंगरे, सुभाष वाणी आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक श्रीराम पवार, प्रदीप पवार, नमिता काणेकर यांनी केले. स्पर्धा मंगेश डोंगरे व संगिता सुवार यांनी सूत्रसंचालन केले. या स्पर्धेतील विजेता संघ नागपूर येथील राज्य स्पर्धेत सहभाग घेणार आहे. त्यासाठी केंद्र संचालक रघुनाथ कासेकर यांनी शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)
कोकण विभागातील नऊ संघ सहभागी.
स्पर्धकांसह प्रेक्षकांचाही स्पर्धेला लाभला उदंड प्रतिसाद.
स्पर्धेत मालवण संघाचे कर्मा नृत्य दुसरे तर पोफली संघाचे टिपरी नृत्य तृतीय.
पोफळीच्या करमणूक केंद्रात पार पडल्या स्पर्धा.
जाखडी, फुगडी नृत्यांनी आणली बहार.

Web Title: Rasikamane won by Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.