शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, रणजित देसाई यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 16:38 IST

coronavirus, school, educationsector, sindhudurgnews नववी, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यी वर्गासाठी २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा आत्मघातकी आहे. त्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा धोका लक्षात घेता या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

ठळक मुद्दे रणजित देसाई यांची शिक्षण विभागाकडे मागणीआत्मघातकी निर्णय, गंभीर परिणामांचा धोका

कुडाळ : नववी, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यी वर्गासाठी २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा आत्मघातकी आहे. त्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा धोका लक्षात घेता या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.संपूर्ण देशातच अद्यापपर्यंत कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाचा धोका अद्यापपर्यंत संपलेला नाही. आपल्या राज्याचा व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता दर दिवशी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शाळा सुरू केल्यास व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा पालक यांच्यामधील एखादी जरी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली तर त्याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

परदेशात तसेच आपल्या देशातील अन्य राज्यात देखील शाळा सुरू करण्याचे घेतलेले निर्णय रद्द करून पुन्हा एकदा शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या चुकीच्या निर्णयामुळे हरियाणा राज्यातील एका शाळेत १६ मुले कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. महाराष्ट्रात देखील नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय अत्यंत घाईगडबडीत व परिणामांचा विचार न करता घेतला गेलेला आहे. या वर्गांत शिकणारी मुलं १५ वर्षे ते १८ वर्षे या वयोगटातील आहेत.

कोरोना सारख्या गंभीर आजाराशी लढा देण्याइतपत त्यांची प्रतिकारशक्ती विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांना धोका देखील फार मोठ्या प्रमाणात संभवतो. आपल्याकडे आरोग्य यंत्रणा देखील अद्यापपर्यंत सक्षम नसून या चुकीच्या निर्णयामुळे कोरोनाचा प्रसार झाला तर त्याला शासनच जबाबदार राहील.त्यातच जिल्ह्यात लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे ताप किंवा अन्य लक्षणे असलेला रुग्ण हा नेमका कोरोना पॉझिटिव्ह आहे की त्याला अन्य आजार आहे हे समजण्यास देखील वेळ लागणार आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये अद्यापपर्यंत निर्जंतुकीकरण किंवा अन्य खबरदारीची उपाययोजना करण्यात आलेली नाही.

शाळा सुरू करताना सर्व बाबी या प्रशासनावर सोपिवण्यात आल्या आहेत. मात्र स्थानिक प्रशासन देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यास सक्षम नाही. आज देखील ग्रामीण भागातून शाळांमध्ये येण्याकरता वाहतुकीची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना बस किंवा अन्य पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या उपस्थितीवर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाने या सर्व बाबींचा पुनर्विचार करून जोपर्यंत कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षक व अन्य लोकांच्या जीवाशी खेळू नये.रणजित देसाई, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, भाजपा गटनेते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग