शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

राणेंना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री करण्याचा कोणीच शब्द दिला नव्हता : सुधीर सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 5:58 PM

नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदाबाबत कॉँग्रेसमध्ये कोणीच शब्द दिला नसल्याचा गौप्यस्फोटही ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. काँग्रेस आणि भाजपा हे एकाच माळेचे मणी आहेत. ते श्रीमंत आणि भांडवालदारांचे पक्ष आहेत. त्यामुळे या पक्षात आपण जाणार नाही. तर बिगर राजकीय पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा आपला मानस असून त्याबाबतची अधिकृत घोषणा जानेवारीमध्ये करणार असल्याची माहीती देत काँग्रेस आणि भाजपावर सडकून टीका केली.

ठळक मुद्दे सुधीर सावंत यांचा गौप्यस्फोट काँग्रेस, भाजप हे एकाच माळेचे मणी, काँग्रेसमध्ये परतण्याचा केला इन्कारराज्याचा मुख्यमंत्री भांडवलदार ठरवतातगैर काँग्रेस गैर भाजपा आघाडी स्थापन करणार!

सिंधुदुर्गनगरी, 28 : काँग्रेस आणि भाजपा हे एकाच माळेचे मणी आहेत. ते श्रीमंत आणि भांडवालदारांचे पक्ष आहेत. त्यामुळे या पक्षात आपण जाणार नाही. तर बिगर राजकीय पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा आपला मानस असून त्याबाबतची अधिकृत घोषणा जानेवारीमध्ये करणार असल्याची माहीती देत काँग्रेस आणि भाजपावर सडकून टीका केली. नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदाबाबत कॉँग्रेसमध्ये कोणीच शब्द दिला नसल्याचा गौप्यस्फोटही ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.ब्रिगेडियर सुधीर सावंत हे आपल्या स्वगृही परतणार अर्थात पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार आदी वृत्ते प्रसिद्ध होताच गुरूवारी येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ब्रिगेडियर सुधीर सावंत बोलत होते. यावेळी आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना ब्रिगेडियर सावंत म्हणाले की, नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिल्याने आपण पुन्हा स्वगृही परतणार आहोत. काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी वृत्ते प्रसिद्ध होत आहेत. मुळात काँग्रेस पक्षाने लोकविरोधी कार्यक्रमांची अंमलबजावणी केली.

शेतकºयांच्या जीवावर उठणारे प्रकल्प आणले. त्याला आपला विरोध असल्याने आपण काँग्रेसला सोडचिट्टी दिली होती. काँग्रेसची विचारसरणी ही जनतेच्या विरोधात आहे. काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांनी जनतेचा पैसा जमा केला आणि तो भांडवलदारांना देण्यास सुरुवात केली. या प्रवृत्तीचा आपल जाहीर निषेध करीत असल्याचे यावेळी सुधीर सावंत यांनी सांगितले.

काँग्रेस पक्ष हा जनतेच्या विरोधात काम करीत असल्याने त्यावेळी आपण आपल्या आमदारकीच्या राजीनामा दिला. भ्रष्टाचारी पक्षात जाण्यापेक्षा आपली नवीन पक्ष स्थापन करू असे सांगत काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आपण असल्याच्या वृत्ताला खोडून आपण काँग्रेस पक्षात पुन्हा जाणार नसल्याचे ब्रिगेडियर सावंत यांनी स्पष्ट केले.

गैर काँग्रेस गैर भाजपा आघाडी स्थापन करणार!

गांधी आणि मोदी हे सद्या जनतेच्या पैशाने भांडवलदारांचे खीसे भरत असल्याचा आरोप करत जनतेला लुबडणाºया आणि भ्रष्टाचार राजकारणात जनता बेदखल झाली आहे. त्यामुळे जनतेला न्याय देणाºया पक्षाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण गैर काँग्रेस , गैर भाजपा आघाडी स्थापन करणार आहेत. याची अधिकृत घोषणा जानेवारीमध्ये करण्यात येणार आहे. जनतेने या आघाडीला सहकार्य करावे असे आवाहन ही सावंत यांनी केले. नारायण राणे जेव्हा काँग्रेस पक्षात आले तेव्हा मीही काँग्रेसमध्येच होतो. राणेंशी चर्चा झाली त्या बैठकीच्यावेळी मीही तेथे उपस्थित होतो. मात्र नारायण राणे यांना काँग्रेस पक्षाने केव्हाही मुख्यमंत्री पदाचा शब्द नसल्याचा गौप्यस्फोट सावंत यांनी केला.

राज्याचा मुख्यमंत्री भांडवलदार ठरवतातभाजपाच्या सरकारमध्ये आमदार खासदारांना किंमत नाही. पक्षाच्या नेता सांगेल तसे त्यांना वागावे लागते, असा आरोप करत राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे देशासह राज्यातील भांडवलदार ठरवित असल्याचा आरोप करत आपला या प्रवृत्तीला विरोध असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.