राणेंची दहशत मोडीत : राऊत नूतन खासदारांचे खारेपाटण येथे महायुतीकडून जंगी स्वागत
By Admin | Updated: May 18, 2014 00:25 IST2014-05-18T00:24:59+5:302014-05-18T00:25:24+5:30
कणकवली : लोकसभा निवडणुकीत आमचा विजय झाला आणि जनतेने राणेंची दहशत मोडीत काढल्याचे दिसून आले आहे. परशुरामाच्या भूमीत अन्याय टिकत नाही,

राणेंची दहशत मोडीत : राऊत नूतन खासदारांचे खारेपाटण येथे महायुतीकडून जंगी स्वागत
कणकवली : लोकसभा निवडणुकीत आमचा विजय झाला आणि जनतेने राणेंची दहशत मोडीत काढल्याचे दिसून आले आहे. परशुरामाच्या भूमीत अन्याय टिकत नाही, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. विजयी झाल्यानंतर राऊत हे शनिवारी सिंधुदुर्ग दौर्यावर आले. येथील शिवसेना शाखेत ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार राऊत यांचे खारेपाटण येथे जिल्ह्याच्या सीमेवर महायुतीच्या पदाधिकार्यांनी स्वागत गेले. त्यानंतर खासदार राऊत यांचे कणकवलीत पटवर्धन चौकात ढोलताशांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. खासदार राऊत म्हणाले की, नको असलेले प्रकल्प लोकांच्या माथी मारण्याचे काम नारायण राणे यांनी केले. येणार्या काळात आम्ही जनतेला आवश्यक असलेले उद्योग जिल्ह्यात आणू. अन्न सुरक्षा कायद्यातील त्रुटींमुळे जनतेला धान्य कमी प्रमाणात मिळत आहे. योजनेतील त्रुटी दूर करून मुबलक धान्य मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. आंबा, काजू, मच्छिमारांचा प्रश्न, बेरोजगारी, वनसंज्ञा आदी प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यात गती आणण्यासाठी जातीने लक्ष घालू. ज्या लोकांनी आपणाला भरघोस मतांनी निवडून दिले. त्या सिंधुदुर्गवासीयांशी संपर्क ठेवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सहसंपर्कप्रमुख गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, तालुकाप्रमुख सचिन सावंत, महिला आघाडीप्रमुख स्नेहा तेंडुलकर, आरपीआयचे निरीक्षक तानाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष शरद जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)