शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राणेंनी ईडीच्या भीतीने आपला पक्ष किती दिवसात विलीन केला ते सांगावे!, वैभव नाईकांचे प्रत्युत्तर

By सुधीर राणे | Updated: May 29, 2023 16:53 IST

..त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये

कणकवली: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विलिनीकरणाबद्दल नितेश राणे बोलत आहेत. मात्र, त्यांनी ईडीच्या भीतीने आपला पक्ष भाजपात किती दिवसात विलीन केला हे प्रथम सांगावे असे प्रत्युत्तर आमदार वैभव नाईक यांनी दिले. कणकवली येथे आज, सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करावा असा प्रस्ताव संजय राऊत यांनी दिला असल्याचे वक्तव्य केले होते. त्याला आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले.नाईक म्हणाले, आमच्या पक्षाच्या विलीनीकरणाबाबत नितेश राणे बोलत आहेत. मात्र, त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत आपला नवीन पक्ष स्थापन केला. त्यांच्या पक्षाचा त्यांना एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. तसेच तो पक्ष भाजपात विलीन करावा लागला. त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये. त्यांनी आधी आपले भाजप मधील स्थान काय आहे? याचा विचार करावा. मंत्रीपद मिळावे म्हणून फक्त आमच्या पक्षावर टीका करीत राहू नये. ..त्यावेळी समजेलआमच्या पक्षाचे नाव, आमदार, खासदार जरी गेले असले तरी जनता आमच्या सोबत आहे. आमच्या पक्षात शिवसैनिकांची दुसरी फळी निर्माण झाली आहे. तसेच पक्षाची  लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक आमदार निर्माण केले आहेत. त्यामुळे नितेश राणे यांनी आपल्या वरिष्ठांशी बोलून लवकरात लवकर विधानसभेची निवडणूक घ्यावी. त्यावेळी जनता नेमकी कोणासोबत आहे हे त्यांना समजेल. असेही वैभव नाईक म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Vaibhav Naikवैभव नाईक Uddhav Thackerayउद्धव ठाकरे