शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: रामेश्वर-कुणकेश्वराची ३९ वर्षांनी झाली शाही भेट; गाठीभेटी घेत आज पहाटे श्री देव रामेश्वर मंदिरात परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:34 IST

एक हजार वाळूच्या गोण्या भरून सेतू

आचरा : महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून श्री आचरा गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव कुणकेश्वर यांच्या तब्बल ३९ वर्षांनी शाही भेटीचा अविस्मरणीय सोहळा हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला.श्री देव रामेश्वराच्या स्वारीने तीन तपाच्या कालावधीनंतरही पूर्वपार अशा डोंगर दऱ्यासह खाडीपात्राच्या पारंपरिक मार्गाने मार्गक्रमण केले. श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे पोहोचल्यानंतर रामेश्वराने मंदिराला तीन प्रदक्षिणा घालून आपला भाऊ श्री देव कुणकेश्वरची भेट घेतली. हा दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक कुणकेश्वर मंदिरात दाखल झाले होते.श्री देव रामेश्वर मंदिराकडून बुधवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास निघालेली ही देव स्वारी कुणकेश्वर येथे  बुधवारी रात्री अकराच्या सुमारास पोहोचली. प्रथम देव रामेश्वराची स्वारी श्री देव गांगेश्वर मंदिर येथून निघाली होती.एक हजार वाळूच्या गोण्या भरून सेतूगुरुवारी दुपारी श्री देव रामेश्वर आपल्या शाही लवाजम्यासह भक्तांचा गाठीभेटी घेत आज, शुक्रवारी (दि.२८) पहाटे श्री देव रामेश्वर मंदिरात परतले. दरम्यान, देव रामेश्वराच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी रस्त्यांवर सडा रांगोळी करून जागोजागी पताका, रंगीबेरंगी गुढ्या, तोरणे, चलचित्र देखावे उभारले होते. कातवण ग्रामस्थांनी खाडीपात्रात एक हजार  वाळूच्या गोण्या भरून सेतू तयार केला होता. समुद्रकिनारी असलेल्या मारुती मंदिराकडून झुलावा नृत्य करत क्षेत्र श्री कुणकेश्वर येथे श्रींची स्वारी दाखल झाली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग