शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर तालुक्यात नाणार येथे होणारा ग्रीन रिफायनरी पर्यावरणाला बाधक नाही : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 18:25 IST

गिर्ये-रामेश्वर येथे जागतिक दर्जाचे बंदर होणार असून त्यासाठी त्याठिकाणी जमीन हस्तांतरित करण्यासाठी शासनाने नोटीस काढलेली आहे. ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यात नाणार येथे होणार असून हा प्रकल्प पर्यावरणाला बाधक ठरणारा नसल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. देवगड पंचायत समितीमधील सभापतींच्या दालनामध्ये पंचायत समितीच्या विकासकामांच्या पाठपुरावा बैठकीच्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देदेवगड पंचायत समिती येथील बैठकीत आढावाप्राथमिक प्रक्रियेला शेतकऱ्यांना नोटीस देऊन सुरुवात हजारो बेरोजगारांना प्रकल्प रोजगार देणार

देवगड : गिर्ये-रामेश्वर येथे जागतिक दर्जाचे बंदर होणार असून त्यासाठी त्याठिकाणी जमीन हस्तांतरित करण्यासाठी शासनाने नोटीस काढलेली आहे. ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यात नाणार येथे होणार असून हा प्रकल्प पर्यावरणाला बाधक ठरणारा नसल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. देवगड पंचायत समितीमधील सभापतींच्या दालनामध्ये पंचायत समितीच्या विकासकामांच्या पाठपुरावा बैठकीच्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.देवगड पंचायत समितीमधील सभापती जयश्री आडिवरेकर यांच्या दालनामध्ये माजी आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पंचायत समितीच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण शासन स्तरावरती करण्यासाठी विकासकामांच्या पाठपुरावा बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी सभापती जयश्री आडिवरेकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शारदा नाडेकर, संतोष किंजवडेकर, जयदेव कदम, पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर, सदाशिव ओगले, सुनील पारकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर व पंचायत समितीच्या सर्व खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

भाजपाचे महाराष्ट्रामध्ये सरकार असून यामुळे आपण पंचायत समितीमध्ये प्रलंबित राहिलेल्या कामांची माहिती घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या त्या खात्याच्या मंत्रिमहोदयांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असल्याचे जठार यांनी सांगितले. शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, कृषी विभाग, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत विभाग अशा विभागांच्या प्रलंबित कामांची माहिती जठार यांनी जाणून घेतली. 

हजारोंना रोजगार देणार गिर्ये-रामेश्वर या ठिकाणी विजयदुर्ग बंदर होण्यासाठी जागा हस्तांतरित करण्याच्या प्राथमिक प्रक्रियेला शेतकऱ्यांना नोटीस देऊन सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा औष्णीक प्रकल्प होणार नाही. या ठिकाणी जागतिक दर्जाचे बंदर निर्माण होऊन आयात-निर्यात या ठिकाणावरुन करणार आहे.

ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यात नाणार या ठिकाणी होणार आहे. हा प्रकल्प हजारो बेरोजगारांना रोजगार देणारा ठरणार आहे. या ग्रीन रिफायनरी  प्रकल्पासाठी आयात व निर्यात विजयदुर्ग बंदरामधून केली जाणार आहे. यामुळेच विजयदुर्ग बंदर विकसित होण्यासाठी गिर्ये-रामेश्वर येथे शासन जमीन हस्तांतरित करणार असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली. ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा पर्यावरणाचा ऱ्हास करणारा नसून हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन येथे आर्थिक सुबत्ता आणणारा प्रकल्प आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरी