शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात पावसाचा हाहाकार; अनेक वाहने, साकव गेले वाहून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 20:32 IST

जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी रात्री ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने हाहाकार माजविला. माणगाव खो-यात शिवापूर ते आंबेरी दरम्यान पुरस्थिती निर्माण झाली होती.

सिंधुदुर्ग : जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी रात्री ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने हाहाकार माजविला. माणगाव खो-यात शिवापूर ते आंबेरी दरम्यान पुरस्थिती निर्माण झाली होती. तर वैभववाडी तालुक्यात सुकनदीच्या पुरात सांगुळवाडी येथील लोखंडी साकवासह चार दुचाकी आणि एक रिक्षा वाहून गेली. त्यापैकी रिक्षा अद्याप सापडलेली नाही. गडमठमध्ये पुराच्या पाण्यात वाहून जाणा-या कासार्डे-साटमवाडी येथील दामू साटम (६९) या वृद्धाला लोरेतील सुरेंद्र पेडणेकर या युवकाने पुरात उडी मारून वाचविले.माणगाव खो-यात रविवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने शिवापूर ते आंबेरीपर्यंत पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक  घरात, दुकानात पाणी घुसून शेती वाहून गेल्याने नुकसान झाले. 

वैभववाडी तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: दाणादाण उडवून दिली. सुकनदीच्या पुरात सांगुळवाडी येथील लोखंडी साकवासह चार दुचाकी आणि एक रिक्षा वाहून गेली. त्यापैकी रिक्षा अद्याप सापडलेली नाही. मांगवली नरसाळेवाडीतील मंगेश राणे यांची नारळबाग पुराच्या लोंढ्यात उद्ध्वस्त झाली आहे. तर तालुक्यातील नदीकाठची शेकडो हेक्टर भातशेती पुराच्या गाळात गाडली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाहून जाणा-या कासार्डेतील वृद्धाला वाचवलेकासार्डे साटमवाडी येथील दामू साटम (६९) रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गडमठ साटमवाडी पुलावरुन निघाले होते. त्याचवेळी आलेल्या पुराच्या लोंढ्या सोबत ते पुलावर वाहत जावू लागले. त्यामुळे साटम यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी जवळच असलेले लोरेतील सुरेंद्र ऊर्फ बाळू पेडणेकर यांनी पाण्यात उडी टाकून काही अंतर वाहत गेलेल्या साटम यांना पाण्याबाहेर काढून जीवदान दिले. पेडणेकर हे दामू साटम यांच्या कुटुंबासाठी देवदूत ठरले. पेडणेकर यांनी अंधुक प्रकाशात पुरात उडी मारून वृद्धाला वाचविल्याबद्दल त्यांच्या साहसाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. निळेलीत साकव वाहून गेलामाणगाव खो-यात शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे निळेली-देऊळवाडा येथील ओहोळावर ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेला साकव वाहून  गेला. निळेली-देऊळवाडीतील ग्रामस्थ तेथील ओहोळावर दरवर्षी श्रमदानातून साकव बांधतात. शाळेत जाणारी मुले तसेच ग्रामस्थांचीही त्याठिकाणी पावसाळ्यात ये-जा करावी लागते. पावसाळ्यात ग्रामस्थांसाठी हाच मार्ग सोयीस्कर ठरतो. शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे हा साकव वाहून गेला. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरूपी लोखडी साकव बांधून मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.  

टॅग्स :Rainपाऊस