शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

मालवण बाजारपेठेला पावसाचा फटका, अल्प दरात वस्तू विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 16:19 IST

गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या बाजारास मोठा फटका बसला. भाजीपाल्यासह अन्य साहित्य भिजल्याने विक्रेत्यांदा अल्प दरात त्याची विक्री करावी लागली.

ठळक मुद्देमालवण बाजारपेठेला पावसाचा फटका, अल्प दरात वस्तू विकण्याची वेळभाजी मंडई मार्गावर पाणीच पाणी

मालवण :  गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या बाजारास मोठा फटका बसला. भाजीपाल्यासह अन्य साहित्य भिजल्याने विक्रेत्यांदा अल्प दरात त्याची विक्री करावी लागली.गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस गणेशभक्तांकडून जोरदार तयारी सुरू होती. तीन-चार दिवसांपासून चाकरमानीही दाखल होण्यास सुरुवात झाली. मात्र, गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. पावसामुळे काही भाविकांनी शनिवारपासून गणेशमूर्ती घरी नेण्यास सुरुवात केली होती.

रविवारी सकाळपासून मुसळधार पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे भाविकांना आपल्या गणेशमूर्ती घरी नेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. प्लास्टिकचा आधार घेत भाविक आपले गणपती घरी नेत असल्याचे दिसून आले.मालवणचा बाजार हा भाजी मंडईलगतच्या रस्त्यावर भरतो. त्यामुळे हा रस्ता गर्दीने फुलून गेलेला असतो. मात्र, रविवारी सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भाजी विक्रेत्यांची भाजी तसेच साहित्य पावसाने भिजून गेले. गटारालगत बसलेल्या भाजी विक्रेत्यांची भाजी गटारातून वाहणाऱ्या पाण्यामुळे भिजल्याने भाविकांनी त्याची खरेदीकरण्याकडे दुर्लक्ष केले.

काही विक्रेत्यांना तर भाजी टाकून देण्याची तर काहींना ती अत्यल्प दरात विकण्याची नामुष्की ओढवली. सायंकाळनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. त्यामुळे भाविकांनी आपल्या गणेशमूर्ती नेण्यासाठी गणेशमूर्ती चित्रशाळांमध्ये गर्दी केल्याचे दिसून येत होते.रात्री उशिरापर्यंत भाविक वाजतगाजत आपल्या गणेशमूर्ती घरी नेत होते.भाविकांसह व्यावसायिकांचे हालगेले दोन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्याने बाजारपेठेतील व्यावसायिकांसमोर चिंतेचे वातावरण होते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने लागणारे माटवीचे साहित्य, भाजीपाला, विविध प्रकारचे फळे, सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ फुलून गेली होती. मात्र सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने खरेदीसाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली.तालुक्यातील विविध गावांमधून भाविक खरेदीसाठी बाजारात येत असल्याने मोठी गर्दी उसळते. मात्र, यावर्षी रविवारच्या बाजाराच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने भाविकांसह व्यावसायिकांचेही हाल झाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMarketबाजारRainपाऊस