सिंधुदुर्गात पावसाच्या तुरळक सरी
By Admin | Updated: September 10, 2015 00:43 IST2015-09-10T00:41:26+5:302015-09-10T00:43:57+5:30
तब्बल अर्धा तास पाऊस

सिंधुदुर्गात पावसाच्या तुरळक सरी
कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांत बुधवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, सकाळी अकरा वाजता तसेच सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतरही जोरदार पाऊस नसल्याने सर्वत्र काळजीचे वातावरण होते. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी अकरा वाजता जोरदार पावसाने सुरुवात केली. तब्बल अर्धा तास पाऊस कोसळल्यानंतर थांबला.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्रीही पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे पुढील काही दिवस असाच जोरदार पाऊस झाल्यास जिल्हावासीयांना दिलासा मिळणार आहे. (वार्ताहर)