शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मृगाची सलामी कोरडीच, लहरी हवामानामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 13, 2023 11:11 IST

वरूणराजाच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

वैभव साळकर 

दोडामार्ग : निसर्गाच्या लहरीपणामुळे कोकणात यंदाच्या मृगाने सलामी दिली ती कोरडीच! त्यामुळे मिरगाची पेरणी झालीच नाही. त्यामुळे लहरी हवामानाने बळीराजाच्या तोंडचे पाणीच पळविले. परिणामी पुढे तरी वरूणराजाची साथ लाभेल अशी आस लावून बळीराजा आकाशाकडे डोळे लावून आणि पुढील नक्षत्रांचा ठोकताळा बांधून आहे.

कोकणातील शेतकरी शेतीच्या कामांना खर तर एप्रिल महिन्याच्या अखेरपासूनच सुरुवात करतो. कोकणात पावसाळी शेतीपूर्वीची मशागतीची कामे तेव्हापासूनच सुरू होतात. मे च्या अखेरीस रोहिणी नक्षत्राने मान्सूनपूर्व ढगांची झलक दाखविल्यावर शेतकरी पावसाची आस आणि हंगामातील रास मनी धरतो. पुढे कोणते नक्षत्र आहे? त्याचे वाहन काय? ते कधी संपते याचा ताळमेळ मनात घोळत असतो. त्याला कारणही तसेच आहे. शेतकऱ्यांचा जेवढा हवामान खात्यावर विश्वास नाही तेवढा विश्वास पंचांग, नक्षत्र व त्यांची वाहने आणि जाणत्यांच्या दाखल्यावर असतो.नक्षत्राच्या वाहनावरून पावसाचा अंदाज भारतीय पंचांगानुसार नक्षत्राचे वाहन हत्ती ,म्हैस ,बेडूक असल्यास दमदार पाऊस ,गाढव ,उंदीर असल्यास मध्यम तर घोडा व कोल्हा असल्यास विरळ पाऊस होतो असा अंदाज बांधला जातो.यंदाचे नक्षत्र   तारीख        वाहन    मृग             ७ जून            हत्ती   आद्रा           २२ जून          मेंढा   पुनर्वसू         ६ जुलै           गाढव   आश्लेषा      ३औगस्ट        म्हैस    मघा           १७ औगस्ट      घोडा    पूर्वा           ३१ औगस्ट       मोर    उत्तरा        १३ सप्टेंबर        हत्ती    हस्त         २७ औगस्ट      बेडूक    चित्रा         ११ औक्टोबर      उंदीर   स्वाती         २४ औक्टोबर     घोडाकाय आहेत नक्षत्र आणि त्यांची वाहने ?जून ते औक्टोबर दरम्यानची ११नक्षत्रे पावसाची समजली जातात. साधारणतः १४ दिवसांचा कालावधी एका नक्षत्राचा असतो. पावसाचे पहिले नक्षत्र मृग त्यांनतर आद्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा व स्वाती. शेवटची तीन नक्षत्रात परतीचा पाऊस सुरू होतो. खास अशा गणितीय सूत्रानुसार या नक्षत्रांचे ठरते. यात मेंढा, म्हैस, कोल्हा, उंदीर, घोडा, गाढव , बेडूक,  मोर असे प्रत्येक नक्षत्राचे वाहन असते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरी