शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

घोणसरीत दारुच्या हातभट्टीवर छापा; १ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 13:25 IST

kankavli, liqerban, sindhudurgnews कणकवली तालुक्यातील घोणसरी गावातील नदीपात्रालगत जंगलमय भागात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू विक्रीसह दारुच्या हातभट्टीवर छापा टाकत १ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास केली.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात, जंगलमय भागातील अड्डा उद्ध्वस्त

कणकवली : कणकवली तालुक्यातील घोणसरी गावातील नदीपात्रालगत जंगलमय भागात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू विक्रीसह दारुच्या हातभट्टीवर छापा टाकत १ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास केली.जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन शेळके, उपनिरीक्षक शाहू देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने धडक कारवाई करीत दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत.घोणसरी येथील व्हिक्टर बस्त्याव बारेत (६२, रा. घोणसरी टेंबवाडी) हा घोणसरी येथील सिरसाचे आळे येथील जंगलमय भागात गावठी बनावटीच्या दारुची निर्मिती करताना आढळून आला. या कारवाईत मुद्देमालासह संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

याबाबत ज्ञानेश्वर कांदळगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच घोणसरी येथील काझीचे बुरुड जवळील जंगलमय भागात जॉन मोतेस पिंटो (५१, रा. घोणसरी टेंबवाडी) हा शनिवारी सकाळी ८.२० वाजण्याच्या सुमारास गावठी बनावटीच्या दारुची निर्मिती करताना आढळून आला. यावेळी मुद्देमालासह संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.कारवाई सुरू असताना जोस्पिन व्हिक्टर बारेत (५५, रा.टेंबवाडी) ही घराजवळील परिसरात गावठी बनावटीची दारू विक्री करीत आहे अशी माहिती समजताच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने छापा टाकून अवैधरित्या विक्री करीत असलेली दारू जप्त केली आहे. या प्रकरणी प्रतीक्षा कोरगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.कणकवली शहरातही गोवा बनावटीची दारू जप्तकणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात अवैधरित्या ७६ हजार ८० रुपयांची गोवा बनावटीची दारू वाहतूक करीत असताना जप्त केली आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास केली. पटवर्धन चौकात कारमधून (क्रमांक एम. एच. ०२, बी. जी. ९९४७) गोवा बनावटीची दारू वाहतूक करीत असल्याच्या संशय आल्यामुळे ऑन ड्युटी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल संदेश आबिटकर यांनी कारचा पाठलाग करीत संशयित आरोपी वामन आत्माराम दळवी (रा. कुडाळ ) व प्रशांत अशोक सावंत (रा. पणदूर, मयेकरवाडी) या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील ७६ हजार ८० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग