राधिका रस्तोगी पालक सचिवपदी

By Admin | Updated: February 3, 2015 23:59 IST2015-02-03T23:31:29+5:302015-02-03T23:59:21+5:30

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालक सचिवांची नियुक्ती करण्यात येते. या अनुषंगाने

Radhika Rastogi as the secretary | राधिका रस्तोगी पालक सचिवपदी

राधिका रस्तोगी पालक सचिवपदी

रत्नागिरी : जिल्ह्याच्या पालक सचिवपदी राधिका रस्तोगी यांची नियुक्ती झाली असून, तसे शासन अध्यादेश मंगळवारी जिल्हा नियोजन समितीकडे प्राप्त झाले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालक सचिवांची नियुक्ती करण्यात येते. या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांच्या पालक सचिवांच्या नियुक्तीचे आदेश आज शासनाने निर्गमित केले. त्यानुसार जिल्ह्याच्या पालक सचिवपदी रस्तोगी
यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी या पदावर मीता राजीवलोचन यांची नियुक्ती झाली होती.
रस्तोगी सध्या वित्त विभागाच्या (लेखा व कोषागारे) सचिव म्हणून काम पाहात आहेत. यापूर्वी त्यांनी पर्यटन विभागाचे सचिवपद भूषविलेले आहे. त्यामुळे त्यांना प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. यापूर्वी रत्नागिरीचे जिल्हाधिकारीपद भूषविलेले विकासचंद्र रस्तोगी यांच्या त्या पत्नी आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Radhika Rastogi as the secretary