शाळांची गुणवत्ता वाढली

By Admin | Updated: January 5, 2015 18:59 IST2015-01-05T18:50:04+5:302015-01-05T18:59:52+5:30

जिल्हा परिषद : जिल्ह्यातील २९३ प्राथमिक शाळा अ श्रेणीत

The quality of schools increased | शाळांची गुणवत्ता वाढली

शाळांची गुणवत्ता वाढली

रहिम दलाल- रत्नागिरी -ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावत आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये प्राथमिक शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या २९३ प्राथमिक शाळांनी अ श्रेणी प्राप्त केली आहे.
ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांची तपासणी सुरू आहे. विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मूल्यांकन याद्वारे करण्यात येत आहे. हे मूल्यांकन २०० गुणांचे ठेवण्यात आले आहे. यामध्ये शालेय व्यवस्थापन, लोकसहभाग, शैक्षणिक संधीची समानता, शैक्षणिक गुणवत्ता आदींचा समावेश करण्यात आला आहे. शाळा व विद्यार्थ्यांचे मुल्यांकन वर्षातून एकदा करण्यात येते.
या मुल्यांकनामध्ये शाळा व्यवस्थापन समितीसमोर विद्यार्थी व शिक्षकांचे कथाकथन, काव्य वाचन, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, शिक्षकांच्या सहाकार्याने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू, फळे आदींची विक्री शाळेच्या क्रीडांगणावर प्रदर्शन भरवून ग्रामस्थांना निमंत्रित करणे, त्यातून खरेदी - विक्री, आर्थिक व्यवहार आदींच्या ज्ञानातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक माहिती समजण्यामध्ये मोठा हातभार लावगण्यात येईल. शाळांना मुल्यांकनानुसार अ, ब, क, ड, ई अशी श्रेणी देण्यात येते.
तालुका व जिल्हास्तरावर शाळांचे मुल्यांकन करण्यासाठी अशा दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या. गतवर्षीपेक्षा यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दर्जामध्ये वाढ झाली आहे. गत शैक्षणिक वर्षामध्ये अ श्रेणीमध्ये ४५ शाळा, ब श्रेणीमध्ये ८९८ शाळा, क श्रेणीमध्ये १७७७ आणि ड श्रेणीमध्ये २३ शाळांचा समावेश होता. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असली तरी शैक्षणिक दर्जा मात्र उंचावत आहे. त्यामुळे प्रत्येक श्रेणीतील शाळांची संख्याही आता वाढू लागली आहे. (शहर वार्ताहर)

तालुकास्तरावर मूल्यांकन समित्या...

तालुकाअबकड
मंडणगड३७११२१९००
दापोली३९१४३११०००
खेड१३९३३०९
चिपळूण२८१६६१७१२
गुहागर१९१४७४००
रत्नागिरी८२२१२४३१
संगमेश्वर७१४९२४१२
लांजा६३१४७१७०
राजापूर१७२८५६१०
एकूण२९३१४००१०३२१४

ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत शाळांच्या मुल्यांकनासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी आणि जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्त्वाखाली समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्यांची तालुका व जिल्हास्तरावरची शाळांच्या गुणवत्तेची पाहणी केल्यानंतर शाळांची श्रेणी ठरविण्यात आली आहे.

गुणांच्या आधारे शाळांचे वर्गीकरण
अ९० ते १०० टक्के
ब८० ते ८९ टक्के
क६० ते ७९ टक्के
ड४० ते ५९ टक्के
इ ० ते ३९ टक्के

Web Title: The quality of schools increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.