बिबट्याला घरात ठेवले कोंडून
By Admin | Updated: August 11, 2014 00:19 IST2014-08-10T23:59:24+5:302014-08-11T00:19:18+5:30
ग्रामस्थ भयभीत : शिवणेत थरार

बिबट्याला घरात ठेवले कोंडून
सचिन मोहिते - देवरुख-संगमेश्वर तालुक्यातील शिवणे गावातील एका घरात आज, रविवारी रात्री नऊ वाजता बिबट्या शिरला. या घटनेमुळे घरातील लोक भयभीत झाले. अखेरीस या बिबट्याला घरात कोंडून घरातील सदस्यांनी याची माहिती वनखात्याला दिली आहे.
शिवणे येथील जगन्नाथ शिंदे यांच्या घरात पुढील दरवाजाने आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या
शिरला. या घटनेमुळे भयभीत झालेल्या घरातील लोकांनी बाहेर जाऊन बाहेरील
सर्व दरवाजांना कड्या घातल्या.
याबाबतची माहिती पोलीसपाटील मनोज शिंदे यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी वनखाते आणि पोलिसांना याबाबतची माहिती आली.
रात्री उशिरा हाती आलेल्या वृत्तानुसार वनखात्याचे कर्मचारी शिवणे गावाकडे येण्यास निघाले होते. दरम्यान, शिवणे हे गाव दुर्गम असल्याने तेथे पोहोचण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. बिबट्या घरात घुसल्याची वार्ता कानोकानी पसरल्यानंतर शेकडो ग्रामस्थांनी या बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.