शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

नगरपंचायत परिसरात ठेकेदाराला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:15 IST

वैभववाडी येथील नगरपंचायत कार्यालय परिसरात मजूर संस्था असलेल्या एका ठेकेदाराला नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यासह त्यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की केली. जवळच असलेल्या अन्य कार्यकर्त्यांनी ठेकेदाराला सोडवून घेतले. त्यामुळे तो बचावला. या मारहाणीचे कारण गुलदस्त्यात असून सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकाराची शहरात चर्चा सुरू होती.

ठळक मुद्देनगरपंचायत परिसरात ठेकेदाराला धक्काबुक्की पदाधिकाऱ्याशी झालेल्या वादाचा परिणाम

वैभववाडी : येथील नगरपंचायत कार्यालय परिसरात मजूर संस्था असलेल्या एका ठेकेदाराला नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यासह त्यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की केली. जवळच असलेल्या अन्य कार्यकर्त्यांनी ठेकेदाराला सोडवून घेतले. त्यामुळे तो बचावला. या मारहाणीचे कारण गुलदस्त्यात असून सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकाराची शहरात चर्चा सुरू होती.नगरपंचायतीमध्ये आढावा सभेचे आयोजन केले होते. सभा संपल्यानंतर नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपंचायतीच्या मुख्य दरवाजानजीक थांबून काही विषयांवर चर्चा करीत होते. ही चर्चा सुरू असताना एक माजी नगराध्यक्ष आणि त्या ठेकेदारामध्ये काही मुद्यांवरून वाद निर्माण झाले. आपल्यामुळेच नगरपंचायत निवडणूक जिंकता आली, अशा अविभार्वात वावरणाऱ्या या ठेकेदाराने त्या पदाधिकाऱ्यांवर आवाज चढविला.

त्यामुळे त्या पदाधिकाऱ्याच्या रागाचा पारा चढला. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या काही समर्थकांनी त्या ठेकेदाराला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. एकाने तर त्याच्या कानशिलात लगावल्याची चर्चा आहे. हा प्रकार सुरू असतानाच काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला सोडवून घेतले. मात्र, त्या पदाधिकाऱ्यांचे समर्थक त्याला शिवीगाळ करीत होते.नगरपंचायत परिसरात मारामारी झाल्याची चर्चा अवघ्या काही मिनिटांत वैभववाडी शहरात पोहोचली. शहरातील अनेकांनी नगरपंचायतीकडे धाव घेतली. हा प्रकार पाहण्यासाठी काहींनी गर्दी केली होती. परंतु या धक्काबुक्कीचे नेमके कारण काय हे समजू शकलेले नाही. या प्रकाराची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग