शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षणाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:21 IST

कुक्कुटपालनासारख्या व्यवसायातून उपजीविकेची साधने विकसित करणे सहज शक्य आहे. त्यासाठी पंचायत समितीतर्फे उमेदमार्फत संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन प्रभारी गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी कोकिसरे येथे केले.

ठळक मुद्दे मानव विकास कार्यक्रमांतर्गत परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षणाचा समारोपस्वावलंबनासाठी उपजीविकेची साधने विकसित करा : शुभदा पाटील

वैभववाडी : स्वावलंबनाचा दृष्टीकोन ठेवून महिलांनी ह्यउमेदह्ण अभियानाच्या माध्यमातून छोटे-छोटे व्यवसाय सुरू करावेत. कुक्कुटपालनासारख्या व्यवसायातून उपजीविकेची साधने विकसित करणे सहज शक्य आहे. त्यासाठी पंचायत समितीतर्फे उमेदमार्फत संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन प्रभारी गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी कोकिसरे येथे केले.कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग, जिल्हा नियोजन समिती आणि मानव विकास कार्यक्रम तालुका स्पेसिफिक योजनेंतर्गत तालुक्यातील कुक्कुटपालन प्रशिक्षणाचा समारोप कोकिसरेत प्रभारी गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक आण्णा बुरंगे, अरुण काबंळे, रिना कुरुळुपे, समुदाय कृषी व्यवस्थापक अनुष्का राठोड, प्रणव सपकाळ आदी उपस्थित होते.पाटील पुढे म्हणाल्या की, राज्यातील गरिबी निर्मूलनासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू करून उमेदच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा व्यवसायातून आर्थिक विकास झालेला दिसला पाहिजे. स्वत:च्या पायावर उभे राहून कौटुंबीक गरजा भागविण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी गरज लागेल तेव्हा उमेदचे सहकार्य घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.तालुक्यात सडुरे-शिराळे, सांगुळवाडी, नावळे, मांगवली आणि कोकिसरे या पाच गावांमध्ये ह्यउमेदह्ण अंतर्गत समूहातील महिलांना परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या पाच गावातील डोंगरी भागातील १५० महिलांनी प्रशिक्षण घेतले.पंचेचाळीस दिवस प्रशिक्षण कार्यक्रमप्रशिक्षणार्थी महिलांना कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गचे डॉ. केशव देसाई, प्राजक्ता सावंत यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी पक्ष्यांचे संगोपन, आजार, घ्यावयाची काळजी, विक्री व्यवस्थापन आदी बाबींची विस्तृत माहिती दिली. तालुक्यात पंचेचाळीस दिवस हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होता. 

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्ग