रस्सीखेच स्पर्धेत पंजाबला दुहेरी मुकूट
By Admin | Updated: February 2, 2015 00:16 IST2015-02-01T23:28:02+5:302015-02-02T00:16:25+5:30
१९ राज्यातील ५५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.

रस्सीखेच स्पर्धेत पंजाबला दुहेरी मुकूट
वेंगुर्ले : टग आॅफ आॅर फेडरेशन आॅफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टग आॅफ वॉर असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघ आयोजित राष्ट्रीय बीच टग आॅफ वॉर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ६०० किलो व ५४० वजनी गटात पंजाबचा संघ
मानकरी ठरला. वेंगुर्ले उभादांडा नवाबाग येथे दोन दिवस सुरू असलेल्या रस्सीखेच स्पर्धेतील अंतिम सामने अत्यंत चुरशीचे झाले. १९ राज्यातील ५५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. आज शेवटच्या दिवशी ५४० किलो वजनी गटात पंजाब संघाने १५ गुणांनी, दिल्ली संघाने १२ गुणांनी, मणिपूर संघाने ९ गुणांनी व गोवा संघाने ६ गुणांनी विजय मिळवून उपांत्य सामन्यात प्रवेश केला. पंजाबने गोव्याला व दिल्लीने मणिपूरला ३-० ने मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला.