सार्वजनिक न्यास नोंदणी आॅनलाईन

By Admin | Updated: May 24, 2017 15:54 IST2017-05-24T15:54:30+5:302017-05-24T15:54:30+5:30

नवीन प्रस्ताव आॅनलाईन सादर करण्याचे आवाहन

Public Trust Registration Online | सार्वजनिक न्यास नोंदणी आॅनलाईन

सार्वजनिक न्यास नोंदणी आॅनलाईन

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. २४ : धमार्दाय आयुक्त कार्यालय मुंबई यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयामध्ये ई- रेकॉर्ड व आॅनलाईन कामकाज पध्दत अवलंबली जात आहे. यामध्ये विश्वस्तांनी नवीन संस्था नोंदणी प्रस्ताव, न्यासाची हिशोब पत्रके, न्यास नोंदणी प्रस्ताव, बद्दल अर्ज प्रस्ताव इ. नवीन प्रस्ताव आॅनलाईन सादर करु शकतात.

या करिता कार्यालयाच्या वेबसाईटचा (Charity.Maharashtra.Gov.in)  वापर करुन विश्वस्तांनी घर बसल्या प्रस्ताव सादर करुन कार्यालयीन कामास सहकार्य करावे असे आवाहन सिंधुदुर्गचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त गौतम सु. दिवाण यांनी केले आहे.

Web Title: Public Trust Registration Online