शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये, ज्येष्ठांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:03 IST

Senior Citizen, Coronavirus Unlock, sindhudurg लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने ज्येष्ठ नागरिक आता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये. त्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करावे, असा सल्ला अनेक ज्येष्ठ नागरिकांकडून दिला जात आहे.

ठळक मुद्देपुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये, ज्येष्ठांचे आवाहन आवश्यक नियमांचे पालन करावे

कणकवली : कोरोनाचा धोका ज्येष्ठांना अधिक असल्याने लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनच त्यांना घरातच थांबावे लागले आहे. त्यामुळे त्यांची विविध प्रकारे गैरसोय झाली आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने ज्येष्ठ नागरिक आता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये. त्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करावे, असा सल्ला अनेक ज्येष्ठ नागरिकांकडून दिला जात आहे.कोरोनाचा धोका ज्येष्ठ नागरिकांना अधिक असल्याने लॉकडाऊन सुरू होताच ज्येष्ठ नागरिकांच्या फिरण्यावर बंधने आली होती. त्यामुळे त्यांचा सकाळी आणि संध्याकाळी फिरण्याचा व्यायाम बंद झाला होता.

काहींची मुले परदेशात अथवा मुंबई, पुण्यासारख्या शहरात होती. त्यामुळे घरात वयोवृद्ध पती-पत्नी दोघेच होती. त्यामुळे किराणा, दूध, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू किंवा तातडीची औषधे आणण्यासाठी बाहेर पडताही येत नव्हते. तसेच ऐनवेळी काही त्रास झाला तर डॉक्टरांकडे जाणेही शक्य होत नव्हते.अशावेळी ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक वेळी शेजाऱ्यांचे सहकार्य मिळतेच असे नाही. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली होती. आता लॉकडाऊन शिथिल झाले तरीही ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडायला सरकारने पूर्णतः मुभा दिलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात घरात राहून ज्येष्ठ नागरिक कंटाळले.लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यक्तींना योग्य वेळी उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू या काळात झाले. अनेक ठिकाणी उपचारासाठी बाहेर नेण्यासाठी वाहनाची उपलब्धता नव्हती तर काही ठिकाणी डॉक्टर वेळेवर उपलब्ध झाले नाहीत, ही त्यामागची मुख्य कारणे होती. त्यामुळे लॉकडाऊन कधी संपतेय, असे सर्वाना वाटत होते. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनचे संकट नको, असेच ज्येष्ठ नागरिकांना वाटते.नियम पाळा, कोरोना टाळाकोरोनाला टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेत नियम पाळले तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार नाही, असे मत ज्येष्ठ व्यक्त करीत आहेत. पुन्हा लॉकडाऊन झाले तर ज्येष्ठ नागरिकांचेच अधिक हाल होतील, असे त्यांना वाटते. त्यामुळे ही वेळ येऊ न देण्यासाठी प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी, असे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.शिस्त पाळायला हवीकोरोनाने देशावरच मोठे संकट आणले आहे. त्यामुळे नाईलाजाने सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. मात्र, सर्वांनीच शिस्त पाळणे गरजेचे आहे. तरच कोरोनाचा संसर्ग टाळता येईल व प्रभावदेखील कमी होईल आणि संकटातून मुक्ती मिळेल.

पुन्हा लॉकडाऊन नकोच !लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे देशाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांचे हाल अधिक झाले. काहींच्या घरात दुसरे कुणीच नसल्याने महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणे मुश्किल झाले होते. काही वेळा आजारी असतानाही औषधोपचार मिळत नव्हता. आता थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नको.- दादा कुडतरकर,जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, सिंधुुुदुर्ग

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकsindhudurgसिंधुदुर्ग