शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

cyclone : चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या शाळांच्या दुरुस्तीस विशेष निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:55 IST

निसर्ग' चक्रीवादळाचा कोकणातील शाळांच्या इमारतींना फटका बसला असून, इमारतींच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. त्याचबरोबर खाजगी अनुदानित शाळांच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून खर्च करण्यास राज्य सरकारकडे परवानगी देण्याची मागणीही केली आहे.

ठळक मुद्देचक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या शाळांच्या दुरुस्तीस विशेष निधी द्याभाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांची मागणी

सिंधुदुर्ग  : ैनिसर्ग' चक्रीवादळाचाकोकणातीलशाळांच्या इमारतींना फटका बसला असून, इमारतींच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. त्याचबरोबर खाजगी अनुदानित शाळांच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून खर्च करण्यास राज्य सरकारकडे परवानगी देण्याची मागणीही केली आहे.ैनिसर्ग' चक्रीवादळामुळे कोकणातील शैक्षणिक संस्थांना मोठा फटका बसला. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाळांवरील कौले व पत्रे उडाली. त्याचबरोबर शाळांच्या इमारतींचेही मोठे नुकसान झाले. सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी शाळांचे जोरदार वाऱ्यामुळे नुकसान झाले. या परिस्थितीत किमान गणेशोत्सवापर्यंत शाळा सुरू होणार नसल्याचा अंदाज आहे.

नुकसान झालेल्या इमारतींच्या दुरुस्तीनंतरच शाळा पुन्हा भरविता येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने दुरुस्तीसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.सरकारी शाळांबरोबरच खाजगी अनुदानित व खाजगी विनाअनुदानित शाळांचेही नुकसान झाले. त्यात विनाअनुदानित तत्वावर शिक्षण देणाऱ्या संस्थांची स्थिती वाईट आहे. खासदार निधीमधून खाजगी अनुदानित शाळांसाठी दुरुस्तीची कामे हाती घेता येतात. मात्र, आमदार निधीसाठी तशी तरतूद नाही. तरी ैनिसर्ग' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून खाजगी अनुदानित शाळांच्या दुरुस्तीसाठी आमदार निधी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी पत्रात केली आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणSchoolशाळा