शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 10:39 IST

tourism Kankavli Sindhudurg- कणकवली शहर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी द्यावा. अशी मागणी कणकवली नगरपंचायत मधील शिवसेनेचे गटनेते सुशांत नाईक व इतर नगरसेवकांनी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देकणकवली पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी निधी द्या सुशांत नाईक यांच्यासह नगरसेवकांची मागणी ; पालकमंत्र्यांना दिले पत्र

कणकवली : कणकवली शहर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी द्यावा. अशी मागणी कणकवली नगरपंचायत मधील शिवसेनेचे गटनेते सुशांत नाईक व इतर नगरसेवकांनी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.याबाबत त्यांनी पालकमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कणकवली शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय , सामाजिक व आर्थिकदृष्ट्या केंद्रबिंदू आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. मात्र, कणकवली शहर गेली काही वर्षे पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यापासून दूर राहिले आहे. त्यामुळे शहरातील जानवली नदीलगत असलेल्या गणपती साना येथे सुसज्ज असे उद्यान व गणपती साना तसेच जानवली नदीकाठचा परिसर सुशोभिकरण व पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याकरिता तीन कोटींचा निधी देण्यात यावा.कणकवलीचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास त्याचा शहरालाही फायदा होणार आहे. तसेच गेली काही वर्षे पर्यटनदृष्ट्या अविकसित राहिलेले कणकवली शहर यामुळे विकासाच्या दृष्टीने प्रकाश झोतात येणार आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा. असेही या पत्रात नगरसेवक सुशांत नाईक , कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, माही परुळेकर, मानसी मुंज, सुमेधा अंधारी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :tourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली