शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींच्या वक्तव्याने कोकणात पडली ठिणगी, कृषी केंद्र चालकांमध्ये दहशत; जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:46 IST

९० कोटींचे व्यवहार धोक्यात?

ओरोस : आंबा-काजू नुकसान भरपाईसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलेल्या कथित चिथावणीखोर वक्तव्यामुळे जिल्ह्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सिंधुदुर्ग ॲग्रो मार्केटियर्स असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तीव्र निषेध नोंदवला आहे.यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा-काजू पिकांचे मोठे नुकसान झाले असून बागायतदार आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे.९० कोटींचे व्यवहार धोक्यात?जिल्ह्यातील बागायतदार आणि कृषी सेवा केंद्र चालक यांच्यात अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बागायतदारांना लागणारी खते व कीटकनाशके मोठ्या प्रमाणावर उधारीवर दिली जातात. दरवर्षी सुमारे ९० कोटी रुपयांपर्यंतचा उधारी व्यवहार विश्वासाने होतो. मात्र, शेट्टींच्या वक्तव्यामुळे या विश्वासाला तडा जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

शेट्टींचे 'ते' विधान काय?१२ मार्च रोजी झालेल्या मोर्चात राजू शेट्टी यांनी, "विक्रेत्यांचे उधारीचे पैसे देऊ नका, मागणी केल्यास दुकानातील माल बाहेर काढा, काही कारवाई झाली तर मी बघून घेईन," असे वक्तव्य केल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. यानंतर काही कार्यकर्त्यांकडून विक्रेत्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.प्रशासनाने खबरदारी घ्यावीअशा वक्तव्यांमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि बागायतदारांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Raju Shetti's statement sparks unrest; Agri-centers seek protection.

Web Summary : Raju Shetti's controversial statement regarding debt repayment has created fear among Agri-center owners in Sindhudurg. The association has appealed to the District Collector for intervention, citing potential threats to their business and social harmony.