शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'दिल्लीतलो चायवालो खय ऱ्हवलो म्हागायचो चटको गरीबाक गावलो, कणकवलीत ठाकरे गटाचे महागाई विरोधात आंदोलन

By सुधीर राणे | Updated: March 28, 2023 16:06 IST

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.

कणकवली: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या महिलांनी एकत्र येत वाढत्या महागाईमुळे केंद्र व राज्य शासनाचा निषेध करीत अप्पासाहेब पटवर्धन चौकात महागाई विरोधी 'चाय पे चर्चा' आणि 'चुलीवरची भाकरी' हे अनोखे आंदोलन केले. शिवसेनेच्या रणरागिणींनी या आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी देत शासनाचा निषेध केला. महिलांनी चुलीवर चहा व भाकरी तयार करून महागाईचा निषेध केला. 'भाओजी, भाओजी, महागाईचे खोके, एकनाथ म्हणतत सगळंच ओके', 'दिल्लीतलो चायवालो खय ऱ्हवलो म्हागायचो चटको गरीबाक गावलो', 'गाडी इली ,गाडी इली गॅस सिलेंडरची गाडी इली, बायका पोरा चीडीचाप झाली', 'आनंदाचो शिधो मिळालो काय गो साखर, तांदळाचा पोता पळाला खय गो', 'पन्नास खोके, महागाई ओके', 'मोदी सरकारचा करायचा काय? खाली डोके वर पाय', 'निषेध असो, निषेध असो, भाजप सरकारचा निषेध असो' अशा विविध घोषणा देत शिंदे व मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नीलम सावंत- पालव,  तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, महिला उपतालुकप्रमुख संजना कोलते, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे, मानसी मुंज, दिव्या साळगावकर, माधवी दळवी, प्रतिभा अवसरे, रोहिणी पिळणकर, संजना साटम, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर यांच्यासह दोनशेहून अधिक महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर अप्पासाहेब पटवर्धन चौकातून बाजारपेठ ते झेंडा चौकातून तेलीआळीमार्गे कणकवली तहसीलदार कार्यालयापर्यंत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार आर. जे. पवार यांना अन्यायकारक गॅस दरवाढ मागे घेण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेInflationमहागाईNarendra Modiनरेंद्र मोदी