चोरट्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव

By Admin | Updated: November 28, 2014 23:52 IST2014-11-28T22:08:49+5:302014-11-28T23:52:06+5:30

अनेक चोऱ्या उलगडणार : कुडाळातील महिलाही पोलिसांच्या निशाण्यावर

Proposal for the extortion of the thieves | चोरट्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव

चोरट्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव

सावंतवाडी : आंबोलीतील कॉन्स्टेबल संजय खाडे यांच्या चाणक्षपणामुळे एक मोठी टोळी पकडण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. आता या टोळीविरोधात पोलीस हद्दपारीचा प्रस्ताव तयार करत असून, सर्व पोलीस ठाण्यांनी चोरीचा तपास पूर्ण केल्यानंतर हा प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस खात्यातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच या चोरी प्रकरणात कुडाळ येथील एका महिलेचा समावेश असून तिलाही पोलीस ताब्यात घेणार आहेत.
आंबोली घाटातून बिसलरीच्या रिकामी बाटल्या गोळा करण्याच्या नावाखाली सदाशिव शिंदे हा अन्य चोरलेला मुद्देमाल कोल्हापूर येथे विक्रीसाठी घेऊन जात असे. मात्र, गुरूवारी चोरट्यांची एक मोठी टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. यापूर्वीही अनेकवेळा इंगळे हा पोलीस ठाण्याच्या आवारातून ये जा करत असे. पण त्याच्यावर एवढा संशय गेला नव्हता. तर यातील अन्य आरोपी हे कुडाळमध्येच रहायचे आणि भंगार गोळा करायचे. यातील नाना गोसावी याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. पण पोलिसांचा संशय त्यांच्यावर गेला नव्हता. मात्र, इंगळेमुळे याचे बिंग फुटले आहे.
सदाशिव इंगळे याने घंटा घेऊन जात असताना बिसलरीच्या रिकाम्या बाटल्या त्यात भरल्या होत्या आणि तो घाटातून बाटल्या गोळा केल्या, हे दाखवण्यासाठी सायकलवरून चालला होता. असे अनेकजण बिसलरी गोळा करण्यासाठी येतात. त्यातीलच आपण असे त्याने भासवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला आहे.
चीज वस्तूपेक्षा भंगार महत्त्वाचे
ही टोळी चोरी करत असताना मोबाईलचा वापर करीत नसे तर ते एखादे काम करायचे असल्यास अगोदर प्लान करत नंतर ते रात्री वेगवेगळया ठिकाणहून एकत्र जमा होत आणि शाळा फोडत होते. मात्र, शाळेतील पैसे तसेच अन्य भंगाराबरोबर ताटे, तांब्या, पेले घेऊन जात असत. पण संगणक वगैरे वस्तूंची ते चोरी करत नव्हते. यामुळे पोलीसही चक्रावून जात असत. (प्रतिनिधी)


चोरट्यांकडून मंदिरेही लक्ष
भंगाराची कुडाळात विक्री
पोलिसांनी पकडलेल्या चारजणांनी अनेक बाबींचा खुलासा पोलिसांसमोर केला असून हे चोरटे चोरलेला माल हा कुडाळात विकत असत. तसेच काही माल हा बेळगाव येथेही विक्रीला नेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, अन्य कुणाकडे भंगार विक्री होते का, याची माहिती पोलीस घेत आहेत.

या चोरीमागे कुडाळातील एक महिला पोलिसांच्या निशाण्यावर आली असून या महिलेनेच हे भंगार विकत घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Web Title: Proposal for the extortion of the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.