शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसान भरपाई द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 10:50 IST

कणकवली तालुक्यातील ७० टक्के भात शेतीचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कणकवली शिवसेनेकडून मंगळवारी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांना दिले.

ठळक मुद्देओला दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसान भरपाई द्या !शिवसेनेची मागणी : कणकवली तहसीलदारांना निवेदन

कणकवली: कणकवली तालुक्यातील ७० टक्के भात शेतीचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कणकवली शिवसेनेकडून मंगळवारी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांना दिले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत , राजू शेट्ये, अँड.हर्षद गावडे, राजु राठोड, शेखर राणे, विलास कोरगावकर, राजु राणे, प्रतिक्षा साटम, वैदेही गुडेकर, अजित काणेकर, राजन म्हाडगुत, ललित घाडीगांवकर, आनंद आचरेकर, विलास गुडेकर, दामू सावंत, सिद्धेश राणे, योगेश मुंज, निकेत भिसे, तेजस राणे, भाई साटम आदी शिवसेना पदाधिकार्‍यांनी आज कणकवली तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की, जुलै तसेच ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातही प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यात ७० टक्के भात शेतीचे नुकसान झाले आहे. काही भागात तर नुकसानीची तीव्रता ९० टक्केपर्यंत आहे. याखेरीज पुढील दोन दिवसांतही अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड होते. या सर्व शेतकर्‍यांना शेतकरी सन्मान योजेंगतर्गत सन २०१७ मध्ये कर्जमाफीचा फायदा अल्प प्रमाणात झाला होता. इथल्या शेतकर्‍यांवर कर्जाचा बोजा वाढला आहे. तसेच यंदाचे जवळपास संपूर्ण भातपीक वाया गेल्याने शेतकरीवर्ग आर्थिकदृष्ट्या पूर्णतः कोलमडून गेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे तातडीने करावेत आणि एकही शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहू नये याची दक्षता शासनाने घ्यावी.शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असते, ही बाब लक्षात घेऊन इथल्या शेतकर्‍यांना ५० हजार ते ६०हजार प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई मिळावी. तसेच तालुक्यात गुंठ्यावर आधारीत भरपाईचे निकष असावेत. अनेक शेतकरी कुळ अथवा देवस्थान जमिनीवर शेती करतात. अशा शेतकर्‍यांचीही खात्री करून भरपाई देण्यात यावी.यंदा शेतीसाठी राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँक यांच्याकडून ८० कोटींचे शेतीकर्ज वाटप झाले आहे. हे कर्ज पूर्णतः माफ व्हावे. ज्या भातशेतीचे पंचनामे झालेले आहेत. त्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी. तसेच पंचनाम्यासाठी जादा कर्मचारी नेमले जावेत अशीही मागणी शिवसेना पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRainपाऊसFarmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग