शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम, गाव न सोडण्याच्या भूमिकेवर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 13:46 IST

उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे समजून घेत विस्थापितांच्या १०० टक्के स्थलांतरासाठी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पुनर्वसन गावठाणात २३ नागरी सुविधांची पूर्तता, मोबदला वाटप आणि भूखंड वाटप होत नाही; तोपर्यंत गाव सोडणार नाही या भूमिकेवर काही प्रकल्पग्रस्त ठाम राहिले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या ह्यठामह्ण भूमिकेमुळे तिढा वाढत चालला आहे.

ठळक मुद्दे गाव न सोडण्याच्या भूमिकेवर काही प्रकल्पग्रस्त ठामसमजूत घालण्याचे प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ

वैभववाडी : उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे समजून घेत विस्थापितांच्या १०० टक्के स्थलांतरासाठी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पुनर्वसन गावठाणात २३ नागरी सुविधांची पूर्तता, मोबदला वाटप आणि भूखंड वाटप होत नाही; तोपर्यंत गाव सोडणार नाही या भूमिकेवर काही प्रकल्पग्रस्त ठाम राहिले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या ह्यठामह्ण भूमिकेमुळे तिढा वाढत चालला आहे.अरुणा प्रकल्पग्रस्त व सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० प्रकल्पग्रस्त गाव न सोडण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, भाजपचे अतुल रावराणे व संदेश पारकर, सभापती लक्ष्मण रावराणे आदींनी पुनर्वसन गावठाणांसह बुडीत क्षेत्राची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपजिल्हाधिकारी जोशी, तहसीलदार रामदास झळके, पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा केली.त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आम्ही गावठाणांतील पत्रा शेडमध्ये कसे रहायचे? तिथे अजून पाणी, वीज या मूलभूत सुविधा नाही. पत्रा शेड पहिल्याच पावसात गळायला लागल्या आहेत. काही प्रकल्पग्रस्तांना अद्यापही भूखंड मिळालेले नाहीत. काहींना मोबदलाही नाही. मग गाव कसे सोडायचे? असा प्रश्न उपस्थित केला.प्रशासन आम्हांला हुसकावून लावू पहातेयआखवणे-भोम गावात अजूनही प्रकल्पग्रस्तांचे वास्तव्य असताना प्रशासनाने आधी वीजपुरवठा खंडित करून गैरसोय केली आहे. त्यातच दोन दिवसांपासून गावात येणारा पर्यायी रस्ता खोदून एसटी सेवाही बंद केली आहे. आम्ही माणसे आहोत. प्रशासन आमच्यावर जुलूम करीत असून मोबदला, भूखंड आणि निवारा न देताच गावातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, आम्ही तसे हटणार नाही, अशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी उपजिल्हाधिकारी जोशी यांच्यासमोर मांडली.प्रशासन सकारात्मक : मंगेश जोशी७५ टक्के प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप झाले आहे. तर ८०० कुटुंबांना भूखंड दिले आहेत. पुनर्वसन गावठाणात तात्पुरत्या ४०० निवारा शेड बांधण्यात आल्या असून प्राथमिक सुविधा देण्याची आमची जबाबदारी आहे. याशिवाय ज्यांना शेड नाहीत त्यांना घरभाडे देण्याची व्यवस्थाही करण्यात येईल.बुडीत क्षेत्रातील शासकीय कार्यालये पुनर्वसन गावठाणात हलविण्यात आली आहेत. धरणाच्या घळभरणीचे काम झाले असून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी केले आहे. 

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्ग