प्रकल्पग्रस्तांना गंडवणारा सूत्रधार अटकेत

By Admin | Updated: January 7, 2015 00:01 IST2015-01-06T22:19:50+5:302015-01-07T00:01:03+5:30

दाभोळ ऊर्जा प्रकल्प : आतापर्यंत ५० लाखांची फसवणूक झाल्याचे उघड.

Project Corrupted Writer | प्रकल्पग्रस्तांना गंडवणारा सूत्रधार अटकेत

प्रकल्पग्रस्तांना गंडवणारा सूत्रधार अटकेत

खेड : दाभोळ ऊर्जा प्रकल्पग्रस्तांची जमीन व्यवहारात आतापर्यंत ५० लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर खेड तालुक्यातील संगलट येथे राहणाऱ्या अब्दुल्ला नाडकर याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्याला खेड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापैकी अन्य दोघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले यांनी ही माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू असून, नाडकर याच्या अटकेमुळे अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़
दाभोळ ऊर्जा प्रकरणात एकूण ५० लाखांपेक्षा अधिक फसवणूक झाल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे. दाभोळ ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दोषींविरोधात सक्त कारवाई करण्याची मागणी काही शेतकऱ्यांनी केली होती.
शिवाय खेड पोलिसात ४ महिन्यांपूर्वी याप्रकरणी अब्दुल्ला नाडकर, त्याचा सहकारी किरण यशवंत जाधव (सुकिवली, खेड) व बद्रुद्दिन खोत (पोफळवणे, चिपळूण) यांच्याविरोधात काही शेतकऱ्यांनी फिर्याद दाखल केली आहे. या तिघांविरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी किरण आणि बद्रुद्दिन यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे.
अब्दुल्ला या आरोपीने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही जामीन नामंजूर केल्यानंतर तो पसार झाला होता. या प्रकरणाचा तपास खेड पोलिसांकडून काढून घेण्यात आला होता आणि तो रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला होता.
या विभागाने आरोपींची सर्व माहिती घेऊन आणि त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेत कडक कारवाईचे संकेत येथील शेतकऱ्यांना दिले होते़ अखेर यातील अब्दुल्ला नाडकर याला मंगळवारी अटक करण्यात या विभागाला यश मिळाले आहे़ त्याला खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ७ दिवस पोलीसकोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)


अशी झाली फसवणूक
खाडीपट्ट्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी येथील दाभोळ ऊर्जा प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आल्या आहेत़ अनेक शेतकऱ्यांची फळझाडे आणि बांधबंदिस्तांचे नुकसान झाले आहे, तर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्याने त्यांनाही नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मात्र, भरपाईचे धनादेश थेट शेतकऱ्यांच्या हाती पडलेच नाहीत, तर ते एजंट म्हणून वावरत असलेल्या तिघांच्या हाती पडल्याने शेतकऱ्यांना लुबाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. निरक्षर असलेल्या या शेतकऱ्यांचे धनादेश दोघांनी परस्पर वटवले असून, धनादेशाच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडली, तर ७५ टक्के रक्कम तिघांनी घेतल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


दोघांना अटकपूर्व जामीन, सूत्रधाराला अटक
सात दिवसांची दिवसांची पोलीस कोठडी
अनेक शेतकऱ्यांना फसविल्याची चर्चा.
सूत्रधाराला ७ दिवसांच्या पोलिस कोठडी.
कडक कारवाईचे पोलिसांनी दिले संकेत.

Web Title: Project Corrupted Writer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.