शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांनी नोटीस नाकारली, अरुणा प्रकल्प : आखवणेत महसूल अधिकारी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 16:08 IST

अरुणा प्रकल्पग्रस्तांना १२/२ ची नोटीस देण्यासाठी आखवणे येथे गेलेले भूसंपादन अधिकारी, मंडल अधिकारी व तलाठी यांच्याकडून नोटीस स्वीकारण्यास नकार देत त्यांच्याकडील कागदपत्रे जाळून टाकण्याची धमकी प्रकल्पग्रस्तांनी दिल्याचे त्यांनी तहसीलदारांना दूरध्वनीवरून कळविले.

ठळक मुद्दे आखवणेत महसूल अधिकारी अडकलेतहसीलदारांचे कारवाईबाबत पोलिसांना आदेश

वैभववाडी : अरुणा प्रकल्पग्रस्तांना १२/२ ची नोटीस देण्यासाठी आखवणे येथे गेलेले भूसंपादन अधिकारी, मंडल अधिकारी व तलाठी यांच्याकडून नोटीस स्वीकारण्यास नकार देत त्यांच्याकडील कागदपत्रे जाळून टाकण्याची धमकी प्रकल्पग्रस्तांनी दिल्याचे त्यांनी तहसीलदारांना दूरध्वनीवरून कळविले.

त्यानुसार शासकीय कामात हस्तक्षेप केल्याबद्दल संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार संतोष जाधव यांनी पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. दरम्यान, ते अधिकारी आखवणेत अडकून पडल्याने तहसीलदार जाधव रात्री उशिरा आखवणे येथे गेले होते.नागपवाडी येथील प्रकल्पग्रस्तांना १२/२ ची नोटीस देण्यासाठी भुईबावडा मंडल अधिकारी एस. बी. यादव, तलाठी आर. आर. आम्रसकर व भूसंपादन अधिकारी सोमवारी दुपारी आखवणे येथे गेले होते. त्यावेळी काही प्रकल्पग्रस्तांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. तसेच अन्य प्रकल्पग्रस्तांनाही नोटीस वाटण्यापासून त्या अधिकाऱ्यांना रोखले.जबरदस्तीने नोटीस देण्याचा प्रयत्न झाला तर तुमच्याकडील कागदपत्रे जाळून टाकू, अशी धमकी काही प्रकल्पग्रस्तांनी दिल्याबाबत मंडल अधिकारी यादव यांनी तहसीलदार जाधव यांना दूरध्वनीवरून कळविले.मंडल अधिकारी यांच्या दूरध्वनीवरील माहितीनुसार आखवणे येथे प्रकल्पग्रस्तांना नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या शासकीय अधिकाºयांना रोखून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने तहसीलदार जाधव यांनी संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच ते अधिकारी तेथे अडकून पडल्यामुळे तहसीलदार जाधव रात्री उशिरा आखवणे येथे गेले होते.मागण्या मान्य न झाल्यास पुनर्वसनाचे काम करू देणार नाहीअरुणा प्रकल्पामुळे आखवणे, भोम व नागपवाडी ही तीन महसुली गावे विस्थापित होत असून तेथील प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे मागण्यांची पूर्तता झाल्याखेरीज १२/२ ची नोटीस बजावली जाऊ नये. तसेच मागण्या मान्य न झाल्यास पावसाळ्यानंतर धरणासह पुनर्वसनाचे काम करू न देण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना दिला आहे. 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग