ग्रामसभेतील प्रकारचा भाजपातर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2015 00:35 IST2015-08-23T00:33:10+5:302015-08-23T00:35:11+5:30

मसुरेत भ्रष्टाचार : भाजपा घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Prohibition of Gramsambhal type BJP | ग्रामसभेतील प्रकारचा भाजपातर्फे निषेध

ग्रामसभेतील प्रकारचा भाजपातर्फे निषेध

मालवण : मसुरे-डांगमोडे येथील मंजूर शेतविहिरीवर तत्कालीन सरपंच व काही पुढाऱ्यांनी संगनमताने अनधिकृतपणे नळयोजना सुरु केली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. असे असताना गावच्या ग्रामसभेत हा पाणी प्रश्न आला असता भाजप सदस्यांच्या अंगावर धावून जाण्याचा काहींनी प्रयत्न केला. या सर्व प्रकारचा तालुका भाजपच्यावतीने निषेध नोंदवण्यात येत आहे.
मागील कालखंडात मसुरेत झालेल्या सर्व विकासकामांची भाजपच्यावतीने चौकशी करण्याचे काम सुरु आहे. लाखो रुपये खर्च करून एका वाडीत खारभूमी क्षेत्रात बांधलेल्या विहिरीवरही लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत लवकरच भाजपचे शिष्टमंडळ सबळ पुरावे घेवून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
आगामी काळात मसुरे -डांगमोडे गावातील भाजपच्या सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना कोण त्रास देत असेल तर भाजपा सहन करणार नाही. तसेच मसुरे ग्रामपंचायतीमध्ये गोपी पालव व अ‍ॅड. पूर्वा ठाकूर या दोन सदस्य भाजपाच्या माध्यमातून निवडून आले आहेत.
येणाऱ्या काळात निश्चितच येथील जनतेला अपेक्षित विकास भाजपाच्यावतीने करण्यात येईल असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यापुढे ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक व्हावा. ग्रामपंचायतीकडे आलेल्या निधीचे वाटप सर्व सदस्यांत समान व्हावे, यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे.
शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगावकर यांनी नव्या विहिरीसाठी निधीची उपलब्धता करून दिली जाईल असे सांगितले आहे. ही विहीर झाल्यास भविष्यात डांगमोडेतील पाण्याचा प्रश्न तिढा नक्की सुटू शकतो, असेही मोंडकर यांनी सांगितले. याबाबत भाजप तालुका कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत अन्य विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी गोपी पालव, दिनेश सुर्वे, गजानन ठाकूर, महेश मांजरेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 

Web Title: Prohibition of Gramsambhal type BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.