खरेदी-विक्री संघ नफ्यात

By Admin | Updated: May 29, 2015 23:45 IST2015-05-29T22:07:33+5:302015-05-29T23:45:58+5:30

गुरुनाथ पेडणेकर यांचा दावा : आमच्यावरील आरोप बिनबुडाचे

The Profit Team Profits | खरेदी-विक्री संघ नफ्यात

खरेदी-विक्री संघ नफ्यात

सावंतवाडी : सावंतवाडी खरेदी-विक्री संघ २००७-०८ या कालावधीत १३ लाख रुपये तोट्यात होता. मात्र, मी चेअरमनपदी बसल्यावर सर्व संचालकांच्या सहभागाने हाच संघ सव्वाचार लाख फायद्यात आणला. आमच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे असून तथ्यहीन असल्याचे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तथा आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी स्पष्ट केले. ते सावंतवाडीतील माजी खासदार नीलेश राणे यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, सभापती प्रमोद सावंत, रवींद्र म्हापसेकर, भाऊ सावंत, गजानन सावंत, रवी मडगावकर, आदी उपस्थित होते.
सभापती पेडणेकर म्हणाले, सावंतवाडी खरेदी-विक्री संघाची स्थिती योग्य नाही, जादा खर्च होणे योग्य नाही, म्हणून मी चेअरमन या नात्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून प्रयत्न केले. पण, पालकमंत्र्यांच्या काही सहकाऱ्यांना बिनविरोध निवडणूक नको होती. त्यामुळे त्यांनी आपणास आठ जागांचा आग्रह धरला आणि आम्हाला सात जागा देत होते. सत्ताधारी पॅनेल म्हणून आम्ही कमी जागा घेणे योग्य नाही. त्यामुळेच निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमची बाजू पडती नाही. ९५३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, चांगल्या कामाची पोचपावती मतदार देतील, अशी आशाही
त्यांनी व्यक्त केली. संघाची स्वत:ची तीन गोडावून असून, सहा धान्य दुकानेही आहेत. आम्ही जेव्हा
२००६-०७ च्या सुमारास संघ ताब्यात घेतला, तेव्हा संघ १३ लाख २२ हजार ९२३ रुपये तोट्यात होता. आता २०१४-१५ मध्ये संघाची अर्थिक स्थिती मजबूत करण्यात आली असून,
संघ चार लाख २३ हजार ६७० रुपये फायद्यात आला आहे. हे सर्व श्रेय
सर्व संचालक मंडळाचे असून, आमच्यावर जो विश्वास टाकण्यात आला त्यातून चांगले काम करू शकलो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)

१३०० क्विंटल भात सडतेय
सभापती गुरू पेडणेकर म्हणाले, आमच्या भाताच्या गोडावूनमध्ये २०१३-१४ मध्ये भाताची उचल झाली नसल्याने १३०० क्विंटल भात सडून चालले आहे. संघाला कमिशनही देण्यात आले नाही, असा आरोपही यावेळी सभापती पेडणेकर यांनी केला.

Web Title: The Profit Team Profits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.