शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज्याभिषेक दिन: कणकवली शहरात मिरवणूक; शिवाजी महाराजांचा जयघोष, विविध नृत्य प्रकारांचे सादरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 11:49 IST

वाहतुकीला कोणाताही अडथळा न होता शिस्तबद्ध पद्धतीने हि मिरवणूक झाली.

कणकवली : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्यावतीने कणकवली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत सोमवारी मिरवणूक काढण्यात आली.कणकवली विजयभवन येथे या मिरवणुकीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. तसेच छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. 'छत्रपती शिवाजी महाराज कि जय', 'जय शिवाजी जय भवानी' चा जयघोष करीत डीजे, लेजीम वाद्याच्या सहाय्याने मोठ्या उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली. वाहतुकीला कोणाताही अडथळा न होता शिस्तबद्ध पद्धतीने हि मिरवणूक झाली.कणकवली येथील विजयभवनकडून हि मिरवणूक श्रीधर नाईक चौक येथे आल्यानंतर श्रीधर नाईक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.तेथून अप्पासाहेब पटवर्धन चौक ते बाजारपेठ मार्गे पटकीदेवी ते छत्रपती शिवाजीनगर ते विजयभवन अशी डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शिवाजी महाराजांचा देखावा साकारण्यात आला होता. यावेळी प्रत्येक चौकात विविध नृत्य प्रकार सादर करण्यात आले. त्याचबरोबर लेझीम नृत्य सादरीकरण करण्यात आले.यावेळी विजयराव नाईक फार्मसी कॉलेजचे संचालक सतीश नाईक,उद्योजक संकेत नाईक, युवक कल्याण संघाचे खजिनदार प्रा. मंदार सावंत, प्रा. मेघा बाणे, प्रा. आदिती सावंत, प्राचार्य डॉ. गणुरे, उपप्राचार्या पूजा पटेल, प्रा.अमर कुलकर्णी, रोहन डोंगरे आदींसह महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShivrajyabhishekशिवराज्याभिषेक