वेटरची नोकरी करत प्रथमेश बारावी पास

By Admin | Updated: May 29, 2015 23:46 IST2015-05-29T22:19:20+5:302015-05-29T23:46:37+5:30

शेतकरी कुटुंबातील मुलगा प्रथमेश याच्या घरात कमावते कोणी नाही. त्यात दोन बहिणींची लग्न आणि

Presthamme Barawi passes the waiter job | वेटरची नोकरी करत प्रथमेश बारावी पास

वेटरची नोकरी करत प्रथमेश बारावी पास

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील प्रथमेश जयवंत आमकर या विद्यार्थ्याने हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करत बारावीची परीक्षा दिली. यामध्ये त्याने ६१ टक्के गुण मिळवून तरुण पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे.
शेतकरी कुटुंबातील मुलगा प्रथमेश याच्या घरात कमावते कोणी नाही. त्यात दोन बहिणींची लग्न आणि दोन भावांचे शिक्षण यामुळे प्रथमेशला दहावीनंतर पुढील शिक्षणाला पाठवायचे की नाही, असा प्रश्न त्याच्या वडिलांसमोर उभा राहिला. प्रथमेश हुशार होता. घरच्या प्रतिकूल परिस्थितीतही दहावीत त्याने ७० टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे ठरविले.
दहावीनंतर पुढचे शिक्षण घ्यायचे तर धामणीपासून ८ किमीवर जायचे. यासाठी गाडी खर्च आलाच व इतर शैक्षणिक साहित्याचा खर्च याचा ताळमेळ बसत नव्हता. त्याने धामणी येथील हॉटेल सनराईजमध्ये वेटरची नोकरी पत्करली. कॉलेज सुटल्यानंतर तो थेट हॉटेलमध्ये यायचा. तेथे रात्री उशिरापर्यंत काम करायचा आणि नंतर घरी यायचा. या धावपळीत अभ्यासाला वेळ कमीच मिळायचा. पहाटे लवकर उठून प्रथमेश अभ्यास करायचा. ग्राहकांकडून मिळणारी टीप व पगार यात काटकसरीने आपला शैक्षणिक खर्च करीत असे. अखेर जिद्दीच्या जोरावर त्याने बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून ६१ टक्के गुण मिळवले. आता पुढील शिक्षणासाठी देवरुख किंवा रत्नागिरी शहराच्या ठिकाणी जायचे म्हटले तर नोकरी करुन ते कितपत शक्य होईल, याबाबत प्रथमेश साशंक आहे. (वार्ताहर)

Web Title: Presthamme Barawi passes the waiter job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.