सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हद्दपार
By Admin | Updated: October 10, 2014 23:01 IST2014-10-10T22:19:18+5:302014-10-10T23:01:42+5:30
निवडणुकीची पार्श्वभूमी : आणखी तिघांचा समावेश

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हद्दपार
कणकवली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह चौघांवर प्रशासनाने हद्दपारीची कारवाई केली आहे.
निवडणूक कालावधीत ज्या व्यक्तींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करावी, असा प्रस्ताव पोलीस विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. यापैकी संदेश सावंत यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम ५६ अन्वये ३० दिवसांसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे. मुंबई पोलीस अधिनियम ५७ अन्वये हरकूळ बुद्रुक येथील अनिल मोडकवर तीन महिने व कणकवलीच्या साजिद फकीरवर ३० दिवस हद्दपारीची कारवाई केली आहे. कणकवली उपविभागीय कार्यालयांतर्गत या तिघांवर ही कारवाई झाली आहे.
सावंतवाडी उपविभागीय कार्यालयांतर्गत वेंगुर्ले येथील गौरव मराठेवर मुंबई पोलीस अधिनियम ५६ अन्वये हद्दपारीची कारवाई केली आहे.