शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

कणकवली नगरपंचायतीचा १ कोटी ६१ लाख ४९ हजाराचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 13:25 IST

अर्थसंकल्प चर्चेदरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी सुचविल्या

कणकवली: कणकवली नगरपंचायतीचा सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षाचा १ कोटी ६१ लाख ४९ हजार ७०८ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प  नगरपंचायतीच्या सभागृहात सादर करण्यात आला. ४८ कोटी ९६ लाख ८१हजार ७०० रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चेदरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी सुचविल्या आहेत. त्याचा समावेशही या अर्थसंकल्पात केला जाणार आहे.कणकवली नगरपंचायतीचा सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षाचा एकूण अर्थसंकल्प प्रारंभीच्या शिलकीसह ५० कोटी ५८ लाख ३१ हजार ४०८.४८ रुपयांचा आहे.कणकवली नगरपंचायतीची अर्थसंकल्पीय सभा प. पू भालचंद्र महाराज सभागृहात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, गटनेते संजय कामतेकर, विरोधी पक्ष गटनेते सुशांत नाईक, राष्ट्रवादीचे नगरसेवक अबीद नाईक, नगरसेवक अॅड. विराज भोसले, अभिजीत मुसळे, रवींद्र उर्फ बाबू गायकवाड, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, माही परुळेकर रुपेश नार्वेकर, शिशीर परुळेकर, नगरपंचायत कर्मचारी किशोर धुमाळे यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.नगरपंचायतीच्या लेखापाल प्रियांका सोन्सुरकर यांनी  सभागृहात अर्थसंकल्प मांडला. कणकवली शहराचा दिवसेंदिवस विकास होत असून नागरिकांना विविध सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने या अर्थ संकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. नगरपंचायतीची प्रारंभीची शिल्लक ३ कोटी ६५ लाख ६७ हजार ४०७८ आहे. त्यामुळे या रकमेसह कणकवली नगरपंचायतीचा सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षाचा एकूण अर्थसंकल्प ५० कोटी ५८ लाख ३१ हजार ४०८ रुपयांचा आहे. या आर्थिक वर्षात महसुली जमा ८ कोटी ४६लाख ४२ हजार तर भांडवली जमा ३८ कोटी ४६ लाख २२ हजार रुपये होतील. यासर्व जमा झालेल्या निधी मधून ४८ कोटी ९६ लाख ८१ हजार ७०० रुपये हा सर्व खर्च वजा जाता  १ कोटी ६१ लाख ४९ हजार ७०८ रुपये शिल्लक राहतील असा अंदाज या अर्थसंकल्पात वर्तविण्यात आला आहे.

कुत्र्यांच्या नसबंदीसाठीची तरतूद वाढवाया सभेत नगरसेवकानी अर्थ संकल्पावर आपली मते मांडली. तसेच काही तरतुदीत सुधारणा करण्याबाबत सुचविले. नगरसेवक अभिजीत मुसळे यांनी अपंगासाठी असलेल्या निधींचे समप्रमाणात वाटप करण्यात यावे, अशी मागणी केली. यावर समीर नलावडे यांनी अपंगासाठी असलेल्या निधीतून लाभार्थ्याला दुचाकी सारखे वाहन  देण्याऐवजी त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, यादृष्टीने वस्तू देण्यात यावी, अशी तरतूद करण्याची सूचना  अधिकाऱ्यांना केली. तसेच शहरातील कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये ८ लाखांची तरतूद करण्यात आली असून ती वाढवून १५ लाखांपर्यंत करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी संबंधितांना केली.कोपरखळ्यांनी मनोरंजन !या सभेत सत्ताधारी  व विरोधी गटाच्या नगरसेवकानी एकमेकांना निधीच्या मुद्यावरून कोपरखळ्या मारल्या. त्यामुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग