शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाची सिंधुदुर्गात हजेरी, भातशेतीचे मोठे नुकसान; शेतकरी चिंतित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 07:55 IST

बुधवारी दिवसभर पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तरीही ढगाळ वातावरण कायम होते.

कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळीसुद्धा पावसाची रिपरिप सुरूच होती. तर सिंधुदुर्गात अजूनही भातकापणी शिल्लक असून या अवकाळी पावसामुळे भातशेती आडवी होऊन नुकसान झाले आहे.

मंगळवारी रात्री वीज चमकण्यासह ढगांचा गडगडाट जोरदार सुरू होता. त्याच्याच जोडीने जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. दिवाळीपूर्वी भात कापणी संपविण्यासाठी शेतकरी वर्ग प्रयत्नशील आहे. मात्र, पावसाने त्यात व्यत्यय आणला आहे. अनेक ठिकाणी उभे भात पीक जमिनीवर पडले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे.

बुधवारी दिवसभर पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तरीही ढगाळ वातावरण कायम होते. पुढील काही दिवस सलग पाऊस झाल्यास भात शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. यापूर्वी ज्यांची भातकापणी पूर्ण झाली आहे, ते शेतकरी  नुकसानीपासून वाचले आहेत.

- या अवकाळी पावसाचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पावसाने परत जोर धरला आहे. - दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवर याचा मोठा परिणाम होणार आहे. विविध साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. ग्राहकांची वाट व्यापारी बघत आहेत. त्यातच जर पावसाने पुढील काही दिवस सातत्य राखले तर व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होणार आहे. - त्याचप्रमाणे दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याचे नियोजन मनोमन केलेल्या नागरिकांचाही हिरमोड होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये  पाऊस पडू नये अशी इच्छा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग