शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

सिंधुदुर्गात तयारी पूर्ण, हरिनामाने शेवटची रात्र रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 5:01 PM

कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणेश मूतिंर्पैकी काहीचे विसर्जन रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी केले जाणार आहे. त्यामुळे अकरा दिवसांच्या गणेशोत्सवातील शेवटची रात्र शनिवारी रंगणार आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात तयारी पूर्ण, हरिनामाने शेवटची रात्र रंगणारअनंत चतुर्दशी दिवशी गणेशमूतिंर्चे विसर्जन

सिंधुदुर्ग : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणेश मूतिंर्पैकी काहीचे विसर्जन रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी केले जाणार आहे. त्यामुळे अकरा दिवसांच्या गणेशोत्सवातील शेवटची रात्र शनिवारी रंगणार आहे. या रात्री भजनी मंडळे आपली कला श्रींच्या चरणी अर्पण करणार आहेत. त्यादृष्टीने जय्यत तयारी सुरु आहे.कोकणातील महत्वपूर्ण अशा गणेशोत्सवाला 13 सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला. गेले दहा दिवस श्री गणरायाची मनोभावे पूजा, आरती, भजन करण्यात येत आहे. काही ठिकाणी दीड, पाच ,सात, नऊ दिवसांनी श्री गणेश मूतिंर्चे विसर्जन करण्यात आले. रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी मोठ्या प्रमाणात श्री गणेश मूर्तिंचे विसर्जन केले जाईल.त्यासाठी नदीवरील गणपती साण्यावर साफसफाई केली जात आहे. तसेच त्याठिकाणी सुशोभिकरणही करण्यात येत आहे. त्याचबरोबर अनंत चतुर्दशी दिवशी ज्या घरातील श्री गणेश मूतिंर्चे विसर्जन करण्यात येणार आहे त्याघरात शनिवारी गणेशोत्सवातील शेवटची रात्र साजरी करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे.

शनिवारी रात्री या घरात गावातील तसेच इतर परिसरातील भजन मंडळे आपली कला सादर करणार आहेत. त्यांच्या चहापाणाची व्यवस्था करण्यासाठी तयारी केली जात आहे. तर उसळ पाव, वडापाव असा खास बेतहि करण्याचे नियोजन काही घरात करण्यात आला आहे.वातावरण भारावलेले, आज शेवटची रात्रशनिवारची रात्र गणरायाच्या नामस्मरणाने रंगणार आहे. आपला लाडका गणपती बाप्पा परत आपल्या घरी जाणार ही कल्पनाच अनेक भाविकाना नकोशी वाटत आहे. त्यामुळे त्यांचे अंत:करण भरून येत आहे.

गणरायाने आपल्या भेटीला पुढच्या वर्षी लवकर यावे, अशी विनवणी त्याला करण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष केला जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील संपूर्ण वातावरणच जणू भारावल्या सारखे झाले आहे.बाळ गोपाळांकडून नियोजनकणकवली टेंबवाडी येथील मानाच्या संतांच्या गणपतीलाही रविवारी निरोप दिला जाणार आहे. त्याबाबत बाळ गोपाळांकडून नियोजन सुरु आहे. शनिवारी रात्री या ठिकाणीही प्रतिवर्षाप्रमाणे आरती तसेच भजनांचा कार्यक्रम होणार आहे. तर उपस्थित भाविकाना करंजी व ह्यसबजीह्ण असा प्रसाद दिला जाणार आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८sindhudurgसिंधुदुर्ग