शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोद जठार यांचा भाजपा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, उद्या मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 19:52 IST

भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. तसेच नाणार प्रकल्प रद्द केल्याचा निषेधही व्यक्त केला.

सिंधुदुर्ग : भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. तसेच नाणार प्रकल्प रद्द केल्याचा निषेधही व्यक्त केला. उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा सादर करणार असल्याचे ते म्हणाले. राजकीय भांडणामुळे नाणार प्रकल्प रद्द झाला. यात कोकणचे पुढील पन्नास पिढ्यांचे नुकसान झाले. कोकणवासीयांनी कोकण रेल्वे, मुंबई गोवा महामार्ग, धरण प्रकल्प आदी विकास कामांना जमिनी दिल्या. त्याचा फायदा जगाला झाला. पण कोकणात रोजगार निर्माण झाला नाही.

आता तीन लाख कोटींचा प्रकल्प आणि लाखो रोजगार संधी या प्रकल्पातून होणार होता. मात्र प्रकल्पच रद्द झाल्याने आम्ही निराश झालो आहोत.  कोकणवासीयांना रोजगार निर्माण करून देण्याची आम्ही घोषणा केली होती. पण प्रकल्प रद्द झाल्याने ती पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जठार यांनी जाहीर केले. प्रमोद जठार यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जठार म्हणाले, पर्यावरणाची हानी, प्रदूषण आदी कारणांमुळे प्रकल्प रद्द झाला असता तर ते आम्ही समजू शकलो असतो. त्यासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक ग्रामस्थ यांना घेऊन रिफायनरी कंपनीने पानीपत दौरा केला. तेथील रिफायनरी दाखवली. तेव्हा कोणतेही प्रदूषण अथवा निसर्गाची हानी झाली नसल्याचे लक्षात आले. परंतु याबाबतची कोणतीही माहिती न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध केला ही चुकीची घटना आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या नातवाकडून ही अपेक्षा नव्हती. जठार म्हणाले, चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सिंधुदुर्गात येत आहेत. त्याचवेळी आपण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहोत. तसेच पुढील भूमिका नंतर जाहीर केली जाईल असे ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग