वीज कर्मचाऱ्यास कोळंबमध्ये मारहाण
By Admin | Updated: July 23, 2014 23:16 IST2014-07-23T23:07:49+5:302014-07-23T23:16:24+5:30
बाळकृष्ण बिरमुळे हे कोळंब, खैदा, कातवड, आदी भागांत वायरमन म्हणून काम पाहात आहेत

वीज कर्मचाऱ्यास कोळंबमध्ये मारहाण
मालवण : विजेसंदर्भात काही तक्रार असल्यास अगोदर तक्रार बुकात याची नोंद करा. त्यानंतर वीज दुरुस्ती करतो, असे सांगितले म्हणून कोळंब येथील प्रेमचंद्र मांजरेकर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी असलेल्या बाळकृष्ण गोपाळ बिरमुळे (वय ५५, रा. कुंभारमाठ) यांना कामाच्या ठिकाणी मारहाण केली.
ही घटना कोळंब येथे आज, बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. मारहाणीनंतर बिरमुळे यांना मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बिरमुळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बाळकृष्ण बिरमुळे हे कोळंब, खैदा, कातवड, आदी भागांत वायरमन म्हणून काम पाहात आहेत.