शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले गावाची 'पुस्तकाचे गाव' म्हणून निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 17:00 IST

तळेरे : मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी पुस्तकांचे गाव ही संकल्पना राज्य शासन राबवित आहे. पुस्तकांचे गाव विस्तार योजनेंतर्गत कोकण ...

तळेरे : मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी पुस्तकांचे गाव ही संकल्पना राज्य शासन राबवित आहे. पुस्तकांचे गाव विस्तार योजनेंतर्गत कोकण महसूल विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले गावाची 'पुस्तकाचे गाव' म्हणून निवड करण्यात आली. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्म ठिकाण म्हणून हे गाव परिचित असुन यामुळे पुन्हा एकदा पोंभुर्ले गाव प्रकाशझोतात येणार आहे.पुस्तकाचे गाव विस्तार योजनेंतर्गत मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व वाचन संस्कृती जोपासावी यादृष्टीने शासन विविध योजना आखत आहे. पुस्तकांचे गाव ही त्यातील एक महत्वपूर्ण योजना असुन त्याची व्यापकता वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकांचे गाव सुरु करुन योजनेचा विस्तार करण्याचा शासनाचा मनोदय आहे. शुक्रवारी झालेल्या शासन निर्णयानुसार कोकण विभागातून देवगड तालुक्यातील पोंभुर्ले गावाची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा शासनाकडे माणुसकी फाऊंडेशनने प्रस्ताव केला होता.पुस्तकाच्या गावात विविध प्रकारच्या साहित्य, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवास वर्णन अशा सर्वांगीण ग्रंथांनी सुसज्ज असे भव्यदिव्य दालने होणार आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मदत होईल. यापूर्वी पोंभुर्ले गाव आद्य पत्रकार बाळशास्त्री जान्भेकर यांचे जन्मस्थळ म्हणुन प्रसिध्द आहेच. मात्र, पुस्तकांचे गाव जाहिर झाल्याने पर्यटन वृध्दिसाठी निश्चितच त्याचा फायदा होऊ शकेल.

शिवाय ज्येष्ठ लोकांना वाचन खाद्य उपलब्ध होईल. पुस्तकांचे गाव पाहण्यास येणार्या पर्यटकांमुळे रोजगार उपलब्ध होऊ शकेल. ऐतिहासिक असलेल्या या गावाला आता पर्यटनदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी माणुसकी फाऊंडेशनही प्रयत्नशील आहे.कोकतील पहिले पुस्तकांचे गावराज्यभरातील पत्रकार पोंभुर्ले येथे येउन दरवर्षी 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा करतात. पोंभुर्ले गावाला शासनाने कोकणातील पहिले पुस्तकांचे गाव जाहिर केल्याने पोंभुर्ले गाव पुन्हा एकदा पर्यटनदृष्ट्या नजरेत येणार आहे.पुस्तकांचे गाव या योजनेचा विस्तार करण्यासाठी शासन निर्णयाव्दारे औरंगाबाद महसूल विभागात वेरूळ जि. औरंगाबाद, नागपूर विभागात नवेगाव बांध, जि. गोंदिया, कोकण विभागात पोंभुर्ले, जि. सिंधुदुर्ग व पुणे विभागात अंकलखोप (औदुंबर) जि. सांगली या गावात पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

पुस्तकांचे गाव या योजनेमुळे पोंभुर्ले गाव पुन्हा सर्वांसमोर येईल. यामुळे पर्यटन वाढीस चालना मिळेल. वाचनसंस्कृती वाढीस लागेल आणि गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल. - सादिक डोंगरकर, सरपंच पोंभुर्ले

पोंभुर्ले गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ती दुरवर जावी. त्यासाठी पर्यटक गावात यावेत, रोजगार वाढावा यासाठी आमचे प्रयत्न होते. या गावाला शासनाने पुस्तकांचे गाव जाहिर केल्यामुळे त्याला अधिक बळकटी येईल.  - प्रसाद मालपेकर, संस्थापक अध्यक्ष माणुसकी फाऊंडेशन, पोंभुर्ले

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग