शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८२ जागांसाठी पोटनिवडणुका, ५३ ग्रामपंचायती : २३ जूनला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:44 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह एकूण ५३ ग्रामपंचायतींच्या ८२ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून २३ जूनला मतदान होणार आहे तर २४ जूनला मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोटनिवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात २२ मे पासून आचारसंहिता लागू झाली आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात ८२ जागांसाठी पोटनिवडणुका५३ ग्रामपंचायती : २३ जूनला मतदान, २४ जूनला मतमोजणी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह एकूण ५३ ग्रामपंचायतींच्या ८२ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून २३ जूनला मतदान होणार आहे तर २४ जूनला मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोटनिवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात २२ मे पासून आचारसंहिता लागू झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यावर काही ग्रामपंचायतींमधील सरपंच अथवा सदस्य यांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने किंवा गैरकारभार केल्यामुळे त्या जागा रिक्त झाल्या आहेत. अशा रिक्त झालेल्या ५३ ग्रामपंचायतींच्या एक सरपंच आणि ८२ सदस्य पदांसाठी शासनाने पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

२३ जून रोजी मतदान होणार असून २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुका घेण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. यात मालवण तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींच्या ९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यात बांदिवडे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होणार आहे.

सावंतवाडी तालुक्यातील एक ग्रामपंचायत १ रिक्त जागा, वैभववाडी तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या ३ रिक्त जागा, कणकवली तालुक्यातील १ ग्रामपंचायत १ रिक्त जागा, दोडामार्ग तालुक्यातील ५ ग्रामपंचायती ७ रिक्त जागा, कुडाळ तालुक्यातील २० ग्रामपंचायती २६ रिक्त जागा, देवगड तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमधील ३५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहेनिवडणूक कार्यक्रम जाहीरसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या ८२ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात नामनिर्देशन पत्र सादर करणे - ३१ मे ते ६ जून २०१९, नामनिर्देशन पत्राची छाननी- ७ जून २०१९, नामनिर्देशन पत्र मागे घेणे - १० जून २०१९ दुपारी ३ वाजेपर्यंत, अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप-१० जून २०१९ रोजी दुपारी ३ नंतर, मतदान - २३ जून २०१९ रोजी, मतमोजणी - २४ जून २०१९ रोजी असा निवडणूक कार्यक्रम आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsindhudurgसिंधुदुर्ग