पोस्ट, इडीसीद्वारे तब्बल २९ हजार मतदारांचे मतदान
By Admin | Updated: October 8, 2014 23:03 IST2014-10-08T22:24:54+5:302014-10-08T23:03:22+5:30
विधानसभा निवडणूक : महिला कर्मचाऱ्यांना ‘इडीसी’ची सोय

पोस्ट, इडीसीद्वारे तब्बल २९ हजार मतदारांचे मतदान
रत्नागिरी : येत्या १५ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात २९ हजार ५४२ इतके संभाव्य मतदार पोस्टल तसेच निवडणूक कार्य प्रमाणपत्राद्वारे (इडीसी) मतदान करणार आहेत. यात २० हजार ३२५ मतदार पोस्टल मतदान करणार आहेत तर ६७८४ मतदार ‘इडीसी’द्वारे मतदान करणार आहेत.
दापोली मतदारसंघात एकूण २६०४ पोस्टल मतदान तर १४९४ इडीसीव्दारे मतदान करणार आहेत. गुहागर मतदारसंघात एकूण २३६७ पोस्टल मतदान तर ३६७ इडीसी मतदान करणार आहेत. चिपळूण मतदारसंघात एकूण २७८३ पोस्टल मतदान तर ५३५ इडीसी मतदान करणार आहेत.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात एकूण १० हजार ९७७ पोस्टल मतदान तर ३ हजार ९३३ इडीसी मतदान करणार आहेत. राजापूर मतदार संघात एकूण १५९२ पोस्टल मतदान तर ४५५ इडीसी मतदान करणार आहेत.
या मतदारांमध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी श्रेणी १ ते ४, सैनिक मतदार, क्षेत्रीय अधिकारी, श्रेत्रिय सहायक अधिकारी, वाहलचालक (राखीवसह), एस. टी. वाहनचालक, पोलिस कर्मचारी, बुथस्तरावरील अधिकारी, सूक्ष्म मतदान निरीक्षक, कार्यालयीन कर्मचारी आणि अन्य निवडणुकीसंबंधित अधिकारी यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पोस्टल मतदान आणि इडीसी मतदान करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
यापैकी जिल्ह्यातील ४७२२ सैनिकी मतदारांना पोस्टल मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. या मतपत्रिका निवडणूक विभागाला या एक दोन दिवसात मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात एका मतदार संघातील मतदाराला दुसऱ्या मतदार संघात मतदान करताना ते पोस्टाद्वारे मतदान करावे लागणार आहे तर केंद्राबाहेर काम करणाऱ्या कर्मचारी मतदारांना इडीसी द्वारे मतदान करणे सुकर होणार आहे. तसेच इतर जिल्ह्यातील असलेल्या अधिकारी आणि कर्मचारीवर्गाची टपाली मतपत्रिका आणि इडीसी फॉर्मही संबंधित प्रांतांकडे पाठविण्यात आली आहे. या एकूण मतदारांमध्ये मतदान अधिकारी क्र. ३ म्हणून काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या राहत्या ठिकाणीच नियुक्ती देण्यात आल्याने त्यांना इडीसी मतदान करता येणार आहे.
पोस्टाद्वारे तसेच इडीसीद्वारे मतदान करणाऱ्यांची यादी अजूनही निश्चित झालेली नाही. या दोन - तीन दिवसात ही यादी निश्चित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
पोस्टाद्वारे तसेच इडीसीद्वारे मतदान करणारे संभाव्य मतदार मतदारसंघनिहाय
विधानसभा पोस्टलइडीसी
दापोली२६०४१४९४
गुहागर२३६७३६७
चिपळूण२७८३५३५
रत्नागिरी१०९७७३९३३
राजापूर१५९२४५५