शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करा : रमेश पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 20:05 IST

Kankvali Grampanchyat- कणकवली तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी राजकीय पक्षांनी घ्यावी. अशा सूचना कणकवली तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार यांनी दिल्या.

ठळक मुद्देराजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करा : रमेश पवारकणकवली तहसीलदार कार्यालयात ग्रामपंचायत निवडणूक आढावा बैठक

कणकवली : तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या निवडणुका शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी राजकीय पक्षांनी घ्यावी. अशा सूचना कणकवली तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार यांनी दिल्या.कणकवली तालुका ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता आढावा बैठक तहसीलदार दालनात शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच राजकिय पक्ष पदाधिकारी यांची बैठकही घेण्यात आली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती संदेश सावंत- पटेल, माजी उपसभापती महेश गुरव, तोंडवली बावशी माजी सरपंच बोभाटे आदींसह सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, अधिकारी उपस्थित होते.आचारसंहिता पालन करताना खाते प्रमुखांना काही अडचणी आहेत का? अशी विचारणा तहसीलदारांनी केली. त्यांवर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध विकासकामांना मंजुरी मिळालेली आहे. त्यांना काम करताना अडचण येईल का? असे विचारले. तर तहसीलदारांनी काहीच अडचण नाही. पण नव्याने कामे सुरु करता येणार नाहीत. असे सांगितले.सात मतदान केंद्र१५ ते २१ जानेवारी हा निवडणूक आचारसंहिता कालावधी आहे. उमेदवारांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही अर्ज भरण्याची व्यवस्था आहे. ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रत ऑफलाईन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर असलेल्या अर्जाची छाननी होईल. गांधीनगर १, भिरवंडे ३ व तोंडवली - बावशी ३ ठिकाणी मतदान केंद्र आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीElectionनिवडणूक