शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

प्रकल्पग्रस्तांवरील अन्याय दूर करण्यासाठी राजकीय नेत्यांनी एकत्र यावे, राजन तेली यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 21:02 IST

कणकवली: मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात कणकवली शहरातील प्रकल्प बाधितांवर अन्याय होत आहे.

कणकवली: मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात कणकवली शहरातील प्रकल्प बाधितांवर अन्याय होत आहे. तशीच स्थिती कुडाळ शहरातही आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये. तसेच त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी कोणतेही राजकारण न करता एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी केले.कणकवली येथील निवासस्थानी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजन तेली म्हणाले, महामार्गाच्या संदर्भात भाजप पदाधिकारी तसेच प्रकल्प बाधितांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे प्रधान सचिव विकास खारगे व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे. कसाल येथील एक गुंठा जागेला चार पट म्हणजे 8 लाख रुपये मोबदला दिला जात आहे. तर कणकवली शहरातील एक गुंठा जागेला दुप्पट म्हणजे पाच लाख तीस हजार रुपये इतका मोबदला प्रकल्पग्रस्तांना दिला जात आहे, हे अन्यायकारक आहे.कणकवली शहरात दहा झोन करण्यात आलेले आहेत. मात्र, त्या दहाही झोनमधून महामार्ग जात नाही. मग प्रकल्प बाधितांना मोबदला देताना तफावत का केली जात आहे? असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. बांधकाम विभागाने जागेचे तसेच मालमत्तेचे केलेले मूल्यांकन चुकीचे आहे. हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर कणकवली शहर ही बाजारपेठ आहे. त्याचा विचारही दर ठरविताना झालेला नाही. त्यामुळे प्रकल्प बाधितावर अन्याय होत आहे.कणकवलीतील प्रकल्प बाधित व राजकीय पक्षाच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतली. हे चांगले आहे. सर्वच पक्ष प्रकल्प बाधितांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. महामार्ग प्राधिकरणचे केंद्रीय अधिकारी विनय देशपांडे यांच्याशी आपण चर्चा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेले प्रस्ताव होते तसे आम्ही मंजूर केले आहेत. जमीन अथवा मालमत्ता यांचा दर ठरविणे हा केंद्राच्या कामाचा भाग नाही असे त्यांनी सांगितले आहे . त्यामुळे दरात तफावत असेल तर त्यासाठी नेमलेल्या लवादाकडे दाद मागावी लागेल.राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याना वस्तुस्थिती समजावून सांगावी लागेल. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे मूल्यांलन केले असेल तर त्याबाबतची सर्व माहिती कागदपत्रासह द्या .त्यांच्यावर कारवाई करु असेही मंत्री तसेच अधिकाऱ्यांनी भेटी दरम्यान आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे कोणावरहि अन्याय होणार नाही यासाठी आमचे प्रयत्न रहाणार आहेत. मोबदला देताना भाडोत्री तसेच व्यापाऱ्यांचा विचारही व्हायला हवा अशी आमची भूमिका असल्याचे राजन तेली यांनी सांगितले.राज्यात कुठल्याही भागात मी पक्षाचे काम करू शकतो!भाजपचा मी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातच नव्हे तर राज्यात कुठल्याही भागात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करु शकतो. त्यासाठी मला विशिष्ट भागाची मर्यादा नाही. असे ए्का प्रश्नाच्या उत्तरा दरम्यान राजन तेली यांनी स्पष्ट केले.मुंबईतील घटनेबाबतचे 'ते'वृत्त चकीचे !मुंबई येथे मंत्रालयात माझ्यावर हल्ला झाला असे सोशल मिडियाद्वारे सर्वत्र पसरलेले वृत्त चुकीचे आहे. असे काहीच झालेले नाही. मंत्रालयात माझ्या सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. माझे जूने सहकारी काका कुडाळकर, धोंडी चिंदरकर तसेच माझा मुलगा सर्वेश हा सुध्दा माझ्या बरोबर होता . त्यामुळे कोणी माझ्यावर हात उचलला असता तर त्याचा हात शिल्लक राहिला असता का? माझ्या वाटेला जाणारा स्वतःच्या पायावर मंत्रालयाबाहेर आला असता काय? याचा विचार करा.सोशल मीडियावर ते वृत्त पसरविणाऱ्यांनी माझी 30 वर्षांची राजकीय कारकीर्द पहावी.मी मी म्हणणारे अनेक थकले आहेत. माझ्या घराची रेकी केली. माझ्यावर पाळत ठेवली. माझ्या मुलावर दोन वेळा हल्ला झाला. तरीही मी घाबरलो नाही. परमेश्वरा व्यतिरिक्त मी कोणालाही घाबरत नाही. आतापर्यंत ज्यांनी मला नाहक त्रास दिला त्यांना नियतीने धडा शिकवला आहे. सत्यविजय भिसे हत्या प्रकरणात मला नाहक गोवणाऱ्या छगन भुजबळांची आज अवस्था काय आहे? ते पाहा. या प्रकरणात मला विनाकारण गुंतवणाऱ्या आणखीन काही जणांना लवकरच नियतीच धडा शिकवेल. त्यामुळे विनाकारण कोणी माझी बदनामी करू नये, असे राजन तेली यावेळी म्हणाले.

टॅग्स :Rajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्ग