शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बडतर्फ कर्मचाऱ्याने घातला धुमाकूळ, पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:46 IST

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विभागातील बडतर्फ विस्तार अधिकाऱ्याने शनिवारी दुपारी कृषी विभागात धुमाकूळ घातला. त्याने कृषी विभागातील टेबल, काचा आणि संगणकाला लक्ष्य करीत त्यांची तोडफोड केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तोडफोड करणाऱ्याला ताब्यात घेतले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत कृषी विभागाचा एकही कर्मचारी तक्रार देण्यास पुढे आला नसल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

ठळक मुद्देबडतर्फ कर्मचाऱ्याने घातला धुमाकूळ, पोलिसांनी घेतले ताब्यात कृषी कार्यालयातील संगणक, टेबलाची तोडफोड

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विभागातील बडतर्फ विस्तार अधिकाऱ्याने शनिवारी दुपारी कृषी विभागात धुमाकूळ घातला. त्याने कृषी विभागातील टेबल, काचा आणि संगणकाला लक्ष्य करीत त्यांची तोडफोड केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तोडफोड करणाऱ्याला ताब्यात घेतले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत कृषी विभागाचा एकही कर्मचारी तक्रार देण्यास पुढे आला नसल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या तळमजल्यातील कृषी विभागातील सेवेतून कमी करण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्यांने शनिवारी दुपारी कृषी विभागात येत काही माहिती मागितली होती. मात्र ती माहिती देण्यात येत नसल्याने संबंधित कर्मचाऱ्याचा पारा चढला. त्याने हातातील लोखंडी रॉड व फरशीने विभागातील टेबल, खुर्च्या, काचा तसेच संगणक तोडण्यास सुरुवात केली.

संबंधित कर्मचारी हातातील रॉडने मिळेल त्या ठिकाणी वार करीत असल्याने या विभागातील महिला कर्मचारी घाबरून गेल्या होत्या. तसेच बघ्यांची संख्याही मोठी होती. मात्र, त्या कर्मचाऱ्याला अटकाव करण्यास कोणी पुढे जात नव्हते. अखेर या घटनेची माहिती ओरोस पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच ओरोस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तोडफोड करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. तसेच घटनेचा पंचनामा केला.याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विभागातील बडतर्फ विस्तार अधिकाऱ्याने अवजारे खरेदीत भ्रष्टाचार केला होता. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला २००९ मध्ये निलंबित करण्यात आले होते.दरम्यान संबंधित कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी सुरू झाली होती. २०१२ मध्ये त्या कर्मचाऱ्यांला पुन:पदस्थापना देण्यात आली होती. संबंधित कर्मचारी चौकशीत दोषी आढळल्याने त्याला २०१३ मध्ये सेवेतून बडतर्फ केले होते. मात्र, हा कर्मचारी आवश्यक कागदपत्रांसाठी कृषी विभागात आला. परंतु२ आवश्यक माहिती विभागातील कर्मचारी देत नसल्याने हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग