वेंगुर्ले येथील पोलीस संघ विजयी

By Admin | Updated: January 2, 2015 00:22 IST2015-01-01T21:27:44+5:302015-01-02T00:22:41+5:30

शूटिंगबॉल स्पर्धा : खर्डेकर स्मृतिदिनाच्या स्पर्धेत सात संघ सहभागी

Police team at Vengurle won | वेंगुर्ले येथील पोलीस संघ विजयी

वेंगुर्ले येथील पोलीस संघ विजयी

वायंगणी : बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या ५१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित शूटिंगबॉल स्पर्धेत वेंगुर्ले पोलीस संघ विजयी झाला.
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित वेंगुर्ले तालुका मर्यादित शूटिंगबॉल स्पर्धेचे उद्घाटन वेंगुर्ले तालुका व्यापारी संघ अध्यक्ष विवेक खानोलकर यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत सात संघ सहभागी झाले होते. यामध्ये वेंगुर्ले पोलीस दोन संघ, वेंगुर्ले पंचायत समिती, खर्डेकर महाविद्यालय, आडेली संघ, खर्डेकर महाविद्यालय प्राध्यापक संघाचा समावेश होता. स्पर्धेत द्वितीय क्रमांक वेंगुर्ले पोलीस संघ ‘ब’, तृतीय क्रमांक बॅ. खर्डेकर महाविद्यालयाने पटकाविला. बक्षीस वितरणप्रसंगी
बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. देऊलकर, पंच अशोक दाभोलकर, बाबली वायंगणकर, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, चेअरमन प्रा. डी. आर. आरोलकर, पोलीस निरीक्षक रतनसिंग रजपूत, गटविकास अधिकारी टी. पी. जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. जे. वाय. नाईक, तर डॉ. चौगुले यांनी आभार मानले.

Web Title: Police team at Vengurle won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.