पोलिसांनी जनतेचे मित्र व्हावे : भोसले

By Admin | Updated: January 13, 2015 00:14 IST2015-01-12T21:55:11+5:302015-01-13T00:14:38+5:30

रेझिंग डे : विविध उपक्रमांमुळे परस्पर संबंध दृढ होतील असा विश्वास

Police should be friends of people: Bhosale | पोलिसांनी जनतेचे मित्र व्हावे : भोसले

पोलिसांनी जनतेचे मित्र व्हावे : भोसले

मंडणगड : ‘रेझिंग डे’ निमित्ताने मंडणगड पोलीस स्थानकाच्यावतीने तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे पोलिसांबद्दल सर्वसामान्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर होऊन, परस्परांतील संबंध अधिक दृढ होतील. त्याच्या फायदा पोलिसांचे कामकाज लोकाभिमुख होण्यास मदत होईल, असा विश्वास उपविभागीय पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी व्यक्त केला.पोलीस रेझिंग डेनिमित्त आयोजित बक्षीस वितरण सोहळ्याचा अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार संजय कदम, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, दलितमित्र दादासाहेब मर्चंडे, उपविभागीय पोलीस निरीक्षक विलास भोसले, तहसीलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी अरुण जाधव, जिल्हा परिषद सदस्य अस्मिता केंद्रे, प्रकाश शिगवण, रामदास रेवाळे, रमेश दळवी, संतोष गोवळे, सचिन थोरे, सुलतान मुकादम, सरपंच महेंद्र सापटे, सुनीता जाधव डॉ. प्रभाकर भावठणकर, दीपक घोसाळकर उपस्थित होते. यावेळी भोसले म्हणाले की, नागरिकांनी पोलिसांचे डोळे बनून काम केल्यास दहशतवादासारखी जगाला भेडसावणारी समस्या क्षणात नष्ट होईल. नागरिकांनी पोलीस मित्र बनून एका जागृत व कर्तव्यनिष्ठ नागरिकाच्या भूमिकेत काम करणे गरेजेचे आहे. पोलीस दल स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविले जात असताना, पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांच्या मार्गदर्शनाखील मंडणगड पोलीस स्थानकातील कर्मचारी व पोलीसपाटलांनी हा कार्यक्रम लोकाभिमुख केला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कार्यक्रम मंडणगड पोलीस स्थानकाच्यावतीने राबवण्यात आला, असे म्हणताना कार्यक्रम राबवण्यासाठी मेहनत करणाऱ्या सर्व घटकांचे यावेळी कौतुक केले़
यावेळी दादा इदाते, आमदार संजय कदम, प्रकाश शिगवण, अस्मिता केंद्रे, सचिन थोरे यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी प्रास्ताविक केले. दयानंद कांबळे व सुनील घोसाळकर यांनी सूत्रसंचालन केले़ (प्रतिनिधी)

Web Title: Police should be friends of people: Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.